👌 *बुध्द निसर्ग मनाचे वास्तव रुप...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३७
निसर्गाचे अतुट सानिध्य
ह्याद्वारे मिळणारा जीवन आनंद
मनाला हवी असणारी शांती
वातावरणाची निखळ शुध्दता
रंगी बिरंगी फुलांचा आस्वाद
पक्षांचे मनसोक्त बागडणे
विभिन्न प्राण्यांना बघण्याची इच्छा
सृष्टीचे विशाल सौंदर्य
हे तर सर्व निसर्गाचाचं भाग आहेत.
आणि जंगलातील प्रवास जीवन
आणि त्याद्वारे मिळणारे खरे प्रेम
प्राचिन इतिहासाच्या जाड भिंती
त्या इतिहासाच्या जाड भिंतीवर बसुन
गीत - कविता लिहिण्याचा आनंद
बुध्द विहारातील बुद्धाचे स्मित हास्य
जगाला प्रेम मैत्री करुणेचा तो संदेश
तेव्हा माणुस हा तर सहजतेने
बुध्दापुढे पुर्णतः नतमस्तक होवुन जातो.
ह्या जीवनातील असणा-या आठवणी
जीवन शिल्प स्वरुपात कोरुन
हृदयात त्या कायमच्या साठवतांना
पुन्हा पुन्हा त्या शांतीच्या जगात
जाणे हे तर नित्याचे झालेले असते
कारण प्रत्येक माणुस
हा प्रेमाचाही भुकेला असतो.
आणि ह्या निसर्ग जगातुन मिळणारे प्रेम
दुसरीकडे सहजतेने मिळणारे नसते
तेव्हा जगात प्रेम किनारा शोधतांना
तो एखाद्या दगडावर बसुन
निसर्ग मनाला केवळ बघत असतो
तेव्हा कळतं नकळत समोर दिसुन येते
बुध्द निसर्ग मनाचे वास्तव रुप....!!!
**************************
नागपुर, दिनांक १७ मार्च २०२४
No comments:
Post a Comment