Wednesday, 9 August 2023

 👌 *शांती भाव... !*

      *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न. ९३७०९८४१३८


शांती भाव मनी जोडण्याचा

बुध्द विश्वाला हे सांगत आहे...


काळी रात्र असे चांदण्यांची

मधुर गंध मोग-याचा आहे

सुर्य आहे रे प्रकाश मैत्रीचा

गुलाब मन इथे सोबत आहे...


द्वेष करू नको माणसाचा

प्रेमाचे बंधन हे निर्मल आहे

बंधुतेला साद असे मैत्रीचा

स्वातंत्र समता हा बोध आहे...


कोप आहे इथे निसर्गाचा

करुणा सागराचे प्रेम आहे

अरि संदेश असे तो द्वेषाचा

प्रेमाचा धागा रोवायचा आहे...


* * * * * * * * * * * * *

नागपूर, दिनांक ३१ जुलै २०२३

No comments:

Post a Comment