Thursday, 3 August 2023

 

💫 *काजवा प्रकाशानी.....!*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर

        मो. न. ९३७०९८४१३८


काजवा प्रकाशानी अंधारी रात्र बोध झाली

बुध्द प्रकाशानी विश्व शांतीची साद आली...


फुलांचा द्वेष करूनी कळीची ही हत्या झाली

गंधा मागे लागुनी रे कस्तुरी मृगी सत्ता आली 

दोषी राजनीतिने रस्त्यावर स्त्री नग्नता झाली

माणसा खामोशीने सत्याची ती अब्रु आली...


करुणेच्या सागराला प्रेम मैत्रीची जोड झाली

प्रेमाच्या राज्यामध्ये वै-याची ही साथ आली

उथळ जीव शेतामध्ये विषाची रे पिके झाली

माणसाच्या माणुसकीची नाव डुबुन आली...


मेलेल्या माणसाची ही मशानात यात्रा झाली

झोप सोंग्या माणसाला आता रे जाग आली

हक्काच्या जाणिवेची वेळ फार निघुन झाली

आता तरी उठा रे, रात्र ही वै-याची आली...


* * * * * * * * * * * * * * * * * 

नागपूर, दिनांक २९ जुलै २०२३

https://youtu.be/0hzSlx4WiG0


No comments:

Post a Comment