Sunday, 27 March 2022

 ✍️ *प्रा.‌ डॉ. यशवंत मनोहरांनी शेवटी स्वत:ला इहवादी साहित्यिक मानले....?*

    *डॉ. ‌मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

मो. न. ९३७०९८४१३८ / ९२२५२२६९२२


       परवा फेसबुक मिडिया वर नामांकित असे साहित्यिक, *प्रा. डॉ. ‌यशवंत मनोहर* ह्यांच्या जन्म दिवसाची मी एक पोष्ट वाचली. सदर पोष्ट ही प्रा. डॉ. यशवंत मनोहर ह्यांच्या कुण्या शिष्याची होती आणि त्या पोष्टमध्ये *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* ह्यांच्या नावाच्या मागे *"इहवादी साहित्यिक"* असा स्पष्टपणे उल्लेख होता. म्हणजे हे मानायला हवे की, माझे कथन अगदी सत्य झाले.‌ कारण प्रा. डॉ. मनोहर हे आंबेडकरवादी साहित्यिक कधीचं नव्हते, ही स्विकार्हता त्यांनी मान्य केली काय ? त्यांच्या लिखाणात हा शुध्द *"व्यवसायवाद"* असायचा. "ते केशवसुत सांगायचे. कार्ल मार्क्स सांगायचे. महात्मा ज्योतिबा सांगायचे. रमाई सांगायचे. आणि तर‌ कधी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही सांगित असत." त्यांची विशेष अशी कुठलीचं बांधिलकी नव्हती. आणि समाज हा त्यांना *"आंबेडकरी साहित्यिक / विचारवंत"* असे म्हणुन चांगला सन्मान देत असायचा. त्यांना आमच्या मंचावर बोलावले जाणे, हे विशेष असायचे. आता आमचा भ्रम दुर झाला, हे एका अर्थी बरे झाले.

    *प्रा.‌‌ डॉ. यशवंत मनोहर* ह्यांची ओळख "आंबेडकरी साहित्यिक / विचारवंत" म्हणुन *"बुध्द - आंबेडकरी साहित्यातील"* हे पर्व आता संपलेले आहे. आमचे मित्र / माजी सनदी अधिकारी *इ.‌ झेड.‌ खोब्रागडे* ह्यांनी *"संविधान साहित्य"* ह्या नावाने अलग अशी दुकानदारी उघडण्याच्या *"असफल प्रयत्न"* केल्यामुळे, त्याची फलश्रृती म्हणुन त्यांना *"बुध्द - आंबेडकरी"* ही बिरुदावली द्यायची काय ? ह्याचा ही साक्षमोक्ष होणे, हे गरजेचे आहे. नामांकित (?) कवि / आमचे मित्र *लोकनाथ यशवंत* ह्यांनी तर *"आंबेडकरी साहित्याची"* बांधिलकी नाकारलेली आहे. वा त्याने स्वत: ला *"वादीहिन साहित्यिक"* म्हणवुन घेण्यास धन्यता मानलेली आहे. विवादीत साहित्यिक *शरणकुमार लिंबाळे 'दलित'* ह्यांना तर *"सरस्वती पुरस्कार"* हा फार मोलाचा दिसतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या *"बाविस प्रतिज्ञा"* त्यांनी नाकारल्याचे हे प्रतिक आहे.‌ त्यांची प्रेरणा *"दलित साहित्य"* हे आहे. दुसरे विवादीत साहित्यिक *प्रा.‌रावसाहेब कसबे* ह्यांनी तर मोहनदास करमचंद गांधी ह्यांच्या विचाराची कास धरलेली आहे.‌ अर्थात प्रा. कसबे ह्यांना *"गांधीवादी साहित्यिक"* असे म्हटल्यास ते अतिशयोक्ती होता कामा नये...!

    माझा जिवलग असा मित्र *प्रा. डॉ. प्रदीप आगलावे* (आता ?) हा *बुध्द - आंबेडकरी साहित्यिक"* आहे काय ? हा संशोधनाचा विषय आहे. ‌कारण त्यानी लिहिलेली बरीच पुस्तके ही *"समाजशास्त्र अभ्यासक्रम"* ह्या विषयाची निगडीत आहेत. आणि ती बरीच पुस्तके ही नामांकित समाजशास्त्रज्ञ ह्यांची *"कॉपी - पेस्ट"* ह्या प्रकारातील आहेत.‌ प्रा. आगलावे ह्यांचा *"समाजशास्त्रज्ञ"* म्हणुन कुठलाही नविन‌ शोध नाही. वा कुठली अशी नविन समाजशास्त्रीय *"थेअरी"* सुध्दा नाही. ‌प्रदिप ह्याचे *"धर्मांतर"* संबधातील पुस्तक हे इतिहास स्वरुपाचे पुस्तक आहे. "आंबेडकरी साहित्य" संदर्भात प्रदिपचे भरीव लिखाण दिसुन येत नाही. महाराष्ट्र शासनाच्या *"डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य प्रकाशन समिती"* वरील *"सदस्य सचिव"* ह्या पदावर तो आता कार्यरत असुन, *"३ १ जनता"* ह्या खंडाच्या नुकत्याच केलेल्या प्रकाशनात, त्याच्यावर *"गैरकायदेशीर / नियमबाह्य / अधिकार क्षेत्र बाहेरील त्याने काम केले असल्याचे"* आरोप करण्यात आला आहे. प्रा. आगलावे ह्याचे बालपण आणि विद्यार्थी जीवन हे ज्यादातर *"सेवाग्राम आश्रमात"* गेलेले आहे. घरच्या *आर्थिक* परिस्थितीमुळे सेवाग्राम आश्रम ट्रस्टींनी प्रदीपला आश्रमात एक कमरा राहाण्यास / अभ्यासाला दिलेला होता. प्रदीपच्या *"बाल विद्यार्थी जीवनात पुर्णत: गांधीवादीचा खुप प्रभाव"* होता. खादीचे कपडे घालणारा प्रदिप मी बघितला आहे. पुढे नागपुरात तो आमच्या संपर्कात आल्यावर प्रदिप हा आजचा प्रदीप दिसतो आहे. *हे सत्य प्रदीप नाकारू शकत नाही.* कारण मी तेव्हा प्रदीपचा एकमेव जवळचा असा मित्र होतो.‌ आणि दुसरा जिगरी मित्र म्हणजे *एड.‌ मिलिन्द बनसोड.* तो नंतर उपजिल्हाधिकारी म्हणुन‌ निवृत्त झाला.

    *"जागतिक (?) आंबेडकरवादी (?) साहित्य महामंडळ (?)"* असे केवल नाव धारण केल्यामुळे, सदर *"जागतिक दर्जा"* हा प्राप्त होत नसतो, हा भ्रम दीक्षाभुमीवर दिनांक २७ मार्च २०२२ रोजी आयोजित *"साहित्य मंडाळाच्या आठव्या वर्धापन दिन"* निमित्ताने, महामंडळाचे स्वयं घोषित जागतिक (?) अध्यक्ष *दिपक खोब्रागडे* आणि महासचिव *सुजित मुरमाडे* ह्यांचा तो भ्रम नक्कीच दुर झालेला असावा. महाराष्ट्र तसेच बाहेर राज्यातील तमाम *"नामवंत आंबेडकरी साहित्यिक मंडळींनी सदर तथाकथित अशा साहित्य परिषदे पासुन दुर अंतर"* ठेवलेले होते. सदर महामंडळाचा *"पुरस्कार"* हा त्या मान्यवरांनी ठोकारला होता. जागतिक / राष्ट्रिय दर्ज्याचे कुणीही *"आंबेडकरी /शोषित - पिडित वर्गाची बांधिलकी स्विकारणारे नामवंत तसेच विचारशील साहित्यिक"* "प्रमुख अतिथी" म्हणुन उपस्थित नव्हते. शेवटी हवसे - गवसे ह्यांना *"राष्ट्रिय / राज्य स्तरीय पुरस्कार"* देवुन, *"बिगर आंबेडकरी साहित्यिकांच्या"* उपस्थितीत सदर परिषद कशी तरी घेवुन तिचा समारोप केला

      *"आंबेडकरी साहित्य"* ह्या विषयावर कुठलीही चर्चा ही सदर परिषदेत झालीच नाही. अध्यक्षीय भाषण करतांना जागतिक मंडळाचा अध्यक्ष (?) *प्रा. दिपक खोब्रागडे* हा पहिला वर्गाचा विद्यार्थी बोलत असतो, अगदी तसा दिपक खोब्रागडे हा बोलुन गेला. जागतिक अध्यक्ष (?) स्तरावर प्रा. दिपक खोब्रागडे ह्याचा *"पेहराव"* असायला हवा, तो सुध्दा नव्हता. आयोजन समितीच्या चेह-यावर *"आनंद "* हा नव्हताचं. केवळ नैराश्य हे दिसत होते. *संचालन* सुरुवात ही थोडी बरी होती. नंतर तर ती खट्याळवाणी होती. प्रा. दिपक खोब्रागडे हा जर *"माझ्या आयोजनातील परिषदेत सहभागी"* झाला असता तर, त्याला *"जागतिक दर्जाची परिषद"* ही कशी असते, हे शिकता आले असते.‌ नुकतीच कोरीयाच्या समन्वयातुन मी घेतलेली "ऑन लाईन"  *"जागतिक शांती परिषद"* ही खोब्रागडेनी बघितली असती तर, त्याला *"आंतरराष्ट्रिय परिषद"* घेण्याचा अनुभव शिकता आला असता. *"संचालन"* कसे असायला हवे ? हे सुध्दा कळलेे असते. दिपक खोब्रागडे ह्याच्या जागतिक परिषदेचे संचालन मात्र मराठीमध्ये झाले. कुठलीही *"जागतिक आंबेडकरी साहित्य परिषद"* घेण्याकरीता *"सर्व आंबेडकरी साहित्याचे व्हिजन"* समजुन घेणे, हे फार गरजेचे आहे. *"जागतिक स्तरावरील शोषित / पिडित वर्गाच्या साहित्याचा"* अभ्यास असायला हवा.*"राष्ट्रिय आणि प्रादेशिक आंबेडकरी साहित्य"* संदर्भात ही अभ्यास असायला हवा. साहित्य संदर्भात बरेच काही सांगता येईल. हा *"बौध्दीक वा वैचारिक अभाव"* माणसाच्या विकासातील फार मोठा अडसर असतो.‌ आणि मैत्रीपुर्ण संबंंध जोपासणे हे ही गरजेचे आहे. इतके समजुन घेतले तरी पुरे...!!!! जय भीम.


* * * * * * * * * * * * * * * * * * *

(नागपूर, दिनांक २७ मार्च २०२२)

No comments:

Post a Comment