👌 *एकदाचं तु सांगुन दे !*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
मन बंध शब्दांची
प्रेम गंध असणारी वाचा
कधीच वैरता सांगत नाही
बुध्दाचा मैत्रीवत भाव
शरीर रक्तभिसरण प्रक्रिया
ही निरंतर सुरु असतांना
दुरत्वपणा कां बरे असावे ?
करुणामय प्रज्ञा शील
न्यायगत स्वातंत्र समता बंधुता
शांती अहिंसा हा बुध्द मंत्र
हे सहज नाही रे मित्रा !!!
ह्या सृष्टी चक्रात
निसर्ग गीत गायन असतांना
तुडवत जाणारे मानवी पाद
हिंसक बनविणारे हे हात
अहिंसक ते अंगुलमाल
अंगुलीमाल ते अहिंसक
असा हा प्राचीन प्रवास
ह्या संसार पथातील काटे
रक्तबंबाळ मन वलय
आज इतिहास सांगतो आहे
मित्रा तुला ही तो इतिहास
पुनश्च लिहायचा आहे काय ???
आजचे आधुनिक जग
युध्द की बुध्द
ह्या गंभिर विवादात
गुरफटले जात असतांना
तुझे प्रामाणिक दायित्व
तुझी ती प्रामाणिक मन निष्ठा
उचित निर्णय घेण्यास
कां टालमटोल करते आहे
कदाचीत तुझ्या अंतर्मनातील
दडलेला तो अहमं स्वार्थ
तुझ्यात आलेला तो देशद्रोह
एकदाचं तु सांगुन दे रे मित्रा
तुझा दगाबाज इतिहास
आता लिहिण्याकरीता !!!
___________________________
नागपूर दिनांक ११ जुन २०२६
No comments:
Post a Comment