Monday, 15 June 2026

 👌 *अहिंसक अंगुलीमाल !!!*

      *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      मो.न. ९३७०९८४१३८


हे अंगुलीमाल

तुझा जीवन इतिहास

एक वेगळाचं संदर्भ आहे

कोसल नरेश राजा प्रसेनजीत

ह्यांच्या राज दरबारातील

बम्हन म्हणजे ब्राम्हण वर्ग नव्हे

तेव्हा ब्राह्मण वर्ग हा अस्तित्वात नव्हताचं

बम्हन अर्थात विद्वत वर्ग होय

प्राचीन बुध्द कालखंडात

मौर्य दरबारातील युनानी इतिहासकार

मेगास्थनीज लिखीत इंडिका ग्रंथ

सात वर्ग हा संदर्भ सांगतो आहे

ब्राम्हणी वर्णव्यवस्थेचा उल्लेख नाही

विद्वत वर्ग - शेतकरी वर्ग 

पशुपालक आणि शिकारी वर्ग

कारागीर आणि व्यापारी वर्ग

सैनिक वर्ग - पर्यवेक्षक एवं गुप्तहेर वर्ग

सल्लागार आणि मंत्रीगण वर्ग

ही ती सात वर्गीय व्यवस्था होती

राजदरबारातील बम्हन पिता गग्ग 

आणि माता मंतानी ह्यांचा तु सुपुत्र

तुझे नाव अहिंसक ठेवले गेले

तुला शिक्षण घेण्याकरीता

तक्षशीला येथे दाखल करण्यात आले

तुझ्या शील आचरणाने

तु आचार्यांंचा प्रिय झाला होतास

परंतु तुझ्या द्वेषमुलक सहपाठींनी

एका सुविद्य आचार्यांना 

तुझे गुरुमातेसोबत (आचार्य पत्नी)

अनैतिक संबध असल्याची

खोटी माहिती ही पेरली होती

आणि त्या संशयी आचार्यांनी

तुला गुरु दान स्वरुपात

एक हजार मानवी शरीर बोटे

ही अनैतिक दान मागणी केली

आणि तु गुरु दान पुर्ण करण्यासं

तक्षशीला विद्यापीठाच्या बाहेर पडलासं

राहागीर लोकांची बोटे कापुन

कापलेल्या बोटांची माळ

तुझ्या गळ्यात घालत असल्याने

तु अहिंसक अंगुलीमाल म्हणुन

प्रजेमध्ये ओळखला जावु लागलासं

तुझ्या स्वत:च्या सुरक्षा कारणाने 

तु घोर जंगलात राहात होतासं

तुझा आतंक सर्वदुर पसरला गेला

संशयी विकृत आचार्याचा उद्देश तर

तुला राजा प्रसेनजीत ह्यांचेकडुन

मृत्युदंड शिक्षा व्हावी हाचं होता

तुझा आतंक हा विजयी झाला

परंतु तथागत बुध्द भेटीतुन

तु पुनश्च अहिंसक झालास

बुध्दाला शरण गेल्यावर

तुझ्या पुर्वीच्या अकुशल कर्माची

शिक्षासुध्दा तु मुकाट्याने सहन केली

अहिंसक ते अंगुलीमाल

अंगुलीमाल ते अहिंसक 

हा तुझा जीवन प्रवास

इतका सहज नाही रे

अहिंसक अंगुलीमाल...!!!

आज ही अंगुलीमाल विकृती

समाजात - देशामध्ये फोफावत आहे

कधी राजसत्ता व्यवस्थेतुन

कधी ह्या समाज व्यवस्थेतुन

कधी स्त्री - पुरुष दगाबाज भावनेतुन

तर कधी कधी प्रेम भंगातुन

अशी ही ब्राम्ह्ण्यवाद विकृती

भारतीय बहुसंख्य मनात पसरल्याने

अंगुलीमाल निर्माण झालेले आहेत

पुनश्च अंगुलीमाल निर्माण होणार आहेत

स्वरुप मात्र ते भिन्न राहाणार आहे

आणि हे वास्तव सत्य आहे

सत्य - अहिंसा - प्रामाणिकपणा

असा हा बुरखा पांघरणारे

देशद्रोही - समाजद्रोही करंटे

अजुनही उथळ मानेने 

ह्या समाजात फिरत आहेत

तुला हे कायमचे थांबवायचे आहे

आता पुनश्च बुध्द विचार प्रवाह

हा तुला पेरायचा आहे

अहिंसक अंगुलीमाल !

अहिंसक अंगुलीमाल !!

अहिंसक अंगुलीमाल  !!!


----------------------------------------

▪️*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

     नागपुर दिनांक १५ जुन २०२६

No comments:

Post a Comment