.💞 *हृदया ना कुठे स्वार्थ यावे...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर
मो. न. ९३७०९८४१३८
मनास शुध्द करुनी बुध्दाला सदा वंदन व्हावे
जीवन संघर्षात ही हृदया ना कुठे स्वार्थ यावे...
सत्य प्रेमाचा अंकुर ह्या हृदयात सदा वास यावे
हातात हात घेताना दान पारमिताचे पालन व्हावे
दया बुध्दी हृदयी पेरता करुणा मना बोध व्हावे
अंतिम सत्य निर्वाण समयी मना बुध्द भाव यावे..
बंधुता भाव साधतांना स्वातंत्र समता बोध व्हावे
प्रज्ञा शील करुणा मनात बुध्द वचन हृदयी यावे
पंचशील अष्टशील पालन होता मन हे शुध्द व्हावे
बुध्द मैत्री करतांना सदा शांती अहिंसा संग यावे...
हे निसर्ग चक्रातील सत्य सृष्टी किरण जीव व्हावे
अनात्म भाव साधतांना अष्टांग मार्ग हा याद यावे
अकुशल कर्म त्याग होता जीवन सत्य बोध व्हावे
सुंदर स्वच्छ जीवनात ह्या क्षमा भाव मनात यावे..
------------------------------------------
नागपूर दिनांक ३१ मे २०२६
No comments:
Post a Comment