👌*बाबांच्या चवदार तळे पाणी सत्याग्रहाची नीव ही तथागत बुद्धपुर्व सिध्दार्थ राजकुमार जीवनातील रोहिनी नदी पाणी संघर्षामध्ये ती दडलेली आहे - डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
बोखडडोह पळसगाव (खुर्द) तहसिल नागभिड जिल्हा चंद्रपुर येथे झालेल्या बौध्द धम्म परिषद - संविधान जागर समारोहामध्ये प्रमुख अतिथी पदावरुन ते बोलत होते.
. फुले आंबेडकर स्मारक समिती बुद्ध विहार दिक्षाभुमी बोकडडोह येथे २० मार्च हा दिवस बाबासाहेबांच्या *"महाड तलाव पाणी सत्याग्रह"* स्मृती म्हणुन साजरा करतांना पाऊसाचा व्यत्यय आला. सदर कार्यक्रम त्यामुळे पुढे ढकलण्यात येवुन २२ मे रोजी सदर समारोहाचे आयोजन करतांना *"धम्म परिषद - संविधान जागर समारोहाचे"* आज सफल आयोजन करण्यात आले. सदर परिषदेत प्रमुख अतिथी पदावरुन बोलतांना जागतिक बौध्द परिषदेचे अध्यक्ष / सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल हयाचे राष्ट्रिय अध्यक्ष / डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु मप्र चे भुतपुर्व व्हिजिटिंग प्रोफेसर *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* म्हणाले की, *"२० मार्च १९२७ ह्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी महाड तलाव पाण्याचा सत्याग्रह केला. सदर लढा हा केवळ पाणी हक्क मिळावा इतका सिमित नसुन सामाजिक समतेचा तो लढा होता.बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहितांना सामाजिक समता हा विषय केंद्रबिंदू ठेवलेला होता. इतकेच नाही तर भारतीय संविधानात लोकशाही तत्वाची नीवं ही बाबासाहेबांनी बुध्दाच्या भिक्खु संघाकडुन घेतलेली आहे. आज आपण आयोजकांनी सदर दोन्ही विषय धम्म परिषद - संविधान जागर समारोह एकत्र जोडुन बाबासाहेबांच्या मिशनला गती दिलेली आहे. बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिला असतांना बुध्दाच्या सिध्दार्थ जीवनातील रोहिनी नदीच्या पाणी संघर्षाला बाबांनी आपले मिशन मानुन महाड तलाव पाण्याचा सत्याग्रह केलेला आहे. राजकुमार सिध्दार्थाचा तो संघर्ष हा पुढे सिध्दार्थाला बुध्दत्वाकडे घेवुन गेला. तर बाबासाहेब हे सुद्धा बोधिसत्व झालेले आहेत. अर्थात प. पु. तथागत बुध्दाचे जीवन मिशन आणि प. पु. बाबासाहेब ह्यांचे जीवन मिशन ह्यामध्ये खुप एकजिनसी विचार दडलेला आहे, हे आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे."*
सदर धम्म परिषद - संविधान जागर समारोहाचे प्रमुख पाहुणे भिक्खु संघाचे भदंत *डॉ. धम्मसेवक महाथेरो* ह्यांचे मार्गदर्शन झाले. आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझे मित्र स्मृतीशेष *मारोतराव कांबळे* ह्यांच्या सुनबाई *प्रा. डॉ. स्निग्धा राजेश कांबळे* ह्या होत्या. ह्याशिवाय .प्रमुख अतिथी म्हणून दैनिक देशोन्नती चे कार्यकारी संपादक आयु. *प्रभाकर कोंडबत्तुनवार* / व्हाइस ऑफ महाराष्ट्र चे संपादक आणि माझे मित्र *भुपेंद्र गणवीर* / विदर्भ राज्य चे *गणेश शर्मा* / समाजसेविका *वर्षा नांदगावे* ह्या मान्यवर ही धम्मपीठावर विराजीत होती.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक *डॉ एम. बी. टेंभुरकर* ह्यांनी तर आभार प्रदर्शन *एड. डॉ. पी. डी. काटकर* ह्यांनी केले. कार्यक्रमाचे सफल संचालन *प्रा. सुरज निमगडे / प्रज्ञा निमगडे / प्रविण रामटेके / बबिता रामटेके* ह्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी *रमाबाई महिला मंडळ* / फुले आंबेडकर स्मारक समितीचे *डॉ एम. बी. टेंभुरकर / एड. डॉ.पी. डी. काटकर / मिलिंद मेश्राम / के. डी. शेंडे / बबिता रामटेके / उज्वला रामटेके / अरुण चव्हाण / हिरालाल मेश्राम काजळसर / वसंता मेश्राम / विलास वानखेडे* इत्यादींचा सहभाग होता.
No comments:
Post a Comment