🌹*प्रेम मैत्रीचा गुलाब !*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
हे मित्रा
शब्द मशाली पेटवता पेटवता
तु हा समाजही पेटवलास
आणि देशालाही सोडले नाहीस
प्रेम मैत्री बंधुता भावना
ही पुर्णत: गारद झालेली आहे
ह्या मनातुन - ह्या देशातुन
अजुन तुला काय पेटवायचे आहे?
ही रक्तक्रांतीची भाषा करुन
आता लाल रक्ताचा सडा
पुन्हा ह्या मातीवर हवे आहे काय?
चक्रवर्ती सम्राट अशोकाने
कलिंग युध्द विजयातील
रणक्षेत्रावर रक्त सडा बघितला
तो पुर्णत: द्रवीत झाला
आणि बुध्दाला शरण गेला
सम्राट अशोकाने पुढे कधीच
युध्दाचा नाद छेडलेला नाही
स्वर्णयुग अखंड भारताची
अशोकाने स्थापना केली
बाबासाहेब आंबेडकर
तु खुप सांगतो आहेस
ज्योतीबा फुले - बुध्द ही
सांगण्यास तु विसरला नाहीस
पण त्यांनी रक्तक्रांतीची भाषा
विद्रोहाचा बुलंद आवाज
आयुष्यात कधीच केलेला नव्हता
त्यांनी संघर्षाचा मंत्र दिला
सत्याग्रह हा मार्ग दिला
रक्तविहीन विचार हे तंत्र होते
परंतु आज कुणी दलित
तर कुणी मार्क्सवाद - लेनीनवाद
तर कुणी गांधीवाद
तर कुणी कट्टर हिंदुत्व सांगुन
प्राचीन जंबुद्विप - भारताला
वैरत्व - द्वेषत्व ह्या जगात
तु आम्हाला घेवुन गेला आहेसं
स्त्री वर्गावरील बलात्कार
उच्च निच हा भेदाभेद करुन
माणुसी शोषण केल्याचा
तुझा बदनाम इतिहास आहे
आणि बलात्कार करतांना
मराठी भाषेलाही तु सोडले नाहीस!
मुख्य मराठी - अहिराणी मराठी
मालवणी मराठी - कोल्हापुरी मराठी
व-हाडी मराठी हा जातीभेद करतांना
जातीव्यवस्था - वर्णव्यवस्था
ही खुप मजबुत केली आहेस, मित्रा
आता प्रेम मैत्री बंधुता जोडणारा
फेव्हिकाल तुझ्याजवळ आहे काय?
फक्त तु एवढेचं सांग
लव्ह जिहाद - धर्मांध पुराण
शिव्यांची लाखोली आता खुप झाले
अतुट प्रेम मैत्रीचा गुलाब
बंधुता गंधाचा मोगरा
स्वातंत्र समतेची सदाफुली
ही बुध्द बाग तु रोपण केलेली काय?
ऐवढेचं बोलं - बाकी काही नको?
तुझ्या बुध्द बाग संवर्धन लिखाणाची समिक्षा
पुन्हा कधी तरी करु !!!
-------------------------------------------
नागपूर दिनांक ५ मे २०२६
No comments:
Post a Comment