Thursday, 7 May 2026

 ✍️ *तु दलितचं राहावे !*

      *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      मो.न. ९३७०९८४१३८


हे मित्रा,

तु दलितचं राहावे

तुझ्या दलितत्व मानसिकतेतुन

आंबेडकरांची वैचारिक क्रांती असो 

वा बुध्दाचा ज्ञानप्राप्ती संघर्ष

आणि धम्म जागृतीचा सार

हा तुझ्या बुध्दी आकलनाचा

विषय होणे संभव नाही....

सावित्री - ज्योतिबा फुले

ह्यांचा शिक्षण चेतना मार्ग असो

वा छत्रपती शाहु महाराजाचे

मागासवर्ग आरक्षण संकल्पना

आता चुकीची वाटु लागली आहे !

कारण त्या महामानवांंच्या

समाज वैचारिक क्रांतीचे मुल्यमापन

करणारे असे महान वीर (?)

भविष्यात जन्माला येतील

कदाचीत ही वैचारिक कल्पना

त्या मान्यवरांनी केलेली नसावी...

पुणेरी जातीय पेशवाई

तोंडाला गाडगे पाठीला झाडु

शोषित हा किती सुंदर दिसायचा

नाही कां रे, मित्रा ?

आता पुनश्च आधीचे दिवस

लादण्याच्या कवायती सुरु आहेत

आणि आम्ही विद्वान (?)

दलितवाद - आंबेडकरवाद

बुध्दवाद - मार्क्सवाद

गांधीवाद - समाजवाद

कट्टर हिंदुत्ववाद

अजुन कोण कोणते वाद (?)

हा वाद वितंडवादातचं

मशगुल झालेले आहोत....

बाबासाहेब आंबेडकरांनी

१४ आक्टोबर १९५६ ला केलेल्या 

धम्मचक्र अनुवत्तन दिनाला

बराचं कालावधी लोटलेला आहे

अजुन आम्ही महावीर (?)

दलित राहाण्यातचं गौरव मानतो

मग शोषकांचा अत्याचार - बलात्कार

लादलेली मानसिक गुलामगिरी

हिला दोष देण्यास काहीचं अर्थ नाही

कारण सदर मानसिक दास्यत्व

आही स्वीकार केलेले आहे

आम्हाला स्वाभिमान नको आहे....

स्वातंत्र म्हणजे स्वैराचार नव्हे 

समता म्हणजे मनमानी नव्हे

आमच्या बंधु - भगिनी

संविधानाने दिलेली समता - स्वातंत्र 

इत्यादी मुलभुत मानवी अधिकाराचे

पुर्णत: दुरुपयोग करीत आहेत

वितंडवादात मजगुल आहेत

आणि आमचे काही महामानव (?)

राजकिय सामाजिक सांंस्कृतिक सत्तीक

हा अल्पसा फायदा घेण्यासाठी

शोषकांचे दास बनत आहेत

शोषकांच्या बेडची दासी बनत आहेत

आमच्या ह्या '"चुक योजनेचा" फायदा

आमचा विरोधी शोषक घेत असल्यास

शोषकाच्या कुटील बुध्दीची

तारिफ ही तर करायलाचं हवी !

आणि आपल्या ह्या विद्वानांची (?)

काय आणि कशी तारिफ करावी ?

आता तुचं आम्हाला सांगावे, मित्रा !!!

तु दलितचं राहावे !

तु दलितचं राहावे !!

तु दलितचं राहावे !!!


-----------------------------------

▪️*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

नागपूर, दिनांक ७ मे २०२६

No comments:

Post a Comment