Friday, 15 May 2026

 👺  *हिटलर....!*

        *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        मो.न. 9370984138


अरे तु अजुनही जीवंत आहेसं

ह्या माणसा माणसात

आणि ह्या जमिनीवरही

तुला मनसोक्त प्रेम करणारी

धीर देवुन सावरणारी

सौंदर्याची महान सुंदरी

इव्हा ही तुझ्या जीवनात आली

आणि तु जग पादाक्रांत करतांंना

सहज वा मुद्दाम विसरुन गेलास

बुध्दाच्या मानवी विचाराला

शांती अहिंसेच्या भावाला....!

म्हणुन चक्रवर्ती सम्राट अशोक

हे नावलौकिक धारण करण्यास

तु येथे कमी पडलास

आणि घात करुन घेतलास

तुझ्यात असलेल्या मेरिटचा

सत्ता काबीज करण्याची

भाषणातुन लोकांना जागविण्याची

तुझी ती विशेष शैली

आज विकृती होवुन बसली आहे

ह्या देशातील नेत्यांमध्ये

अरे तु अजुन जीवंत आहेह

एक खलनायक म्हणुन

ह्या माणसांच्या हृदयात

जल्लाद हिटलर नावाने!

जल्हाद हिटलर नावाने!!

जल्हाद हिटलर नावाने!!!


-------------------------------------

नागपूर दिनांक १६ मे २०२६

(माझी एक जुनी कविता)

No comments:

Post a Comment