Monday, 9 February 2026

 👌*जुन्या प्रेम इतिहासात !*

      *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो.न. ९३७०९८४१३८ 


सुर्याचे तेजस्वी वलय

रात्र ता-यांचे लुकलुकणे

चंद्राचे रुप बदलणे

शीतल किरण छाया

करुणा ही जागृत होतांना

हिवाळी रात्र काजव्यांचा

टिम टिम चमकणारा प्रकाश 

प्रेम भावना अनुभुती देवुन देतो...

निसर्ग समतोल साधतांना

बुद्धांची प्रेम मैत्री बंधुता

प्रज्ञा शील करुणा

अहिंसा पंचशील अष्टशील

अष्टांग मार्ग दहा पारमिता 

कार्यकारण भाव

शुण्यवाद इत्यादीची साद

इतकी सहज नाही रे मित्रा...

बुध्दाला नतमस्तक होतांना

मिळणारी ती मन शांती

इतकी सहज तु समजु नकोस

खुप पिढ्या गारद आहेत

युध्द की बुध्द ह्या विवादात

अहिंसा विजय झालेला आहे

आणि हे चिरकाल सत्य आहे ...

बुध्दाने आपला प्राचिन इतिहास

कोरला आहे ह्या भुतलावर 

स्तुप शिल्प पेंटिग्ज इत्यादी

प्राचिन इतिहास भिंती

जुन्या स्मृतीमध्ये

ती पुर्णतः रमुन गेल्यावर

आपले सौंदर्य सांगतांना

आपले मन मोकळे ही करते

आपल्या जुन्या प्रेम इतिहासात...


-------------------------------------

नागपूर दिनांक ९ फेब्रुवारी २०२६

No comments:

Post a Comment