👌*राणी वदुनी...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
राणी वदुनी इतिहासाला तु साक्ष व्हावी
बुध्द चरणी लीन होतांना ती याद यावी...
वाटा पळवाटा जातांना रे ती साद यावी
जंगलाची ती हिरवी वनराई नाद व्हावी
उजाड वातावरणा ना मनात काहुर यावी
बुध्द विहाराच्या प्रवेशाने ती शांती व्हावी...
इतिहास भिंतीवर तुझी रे ती याद यावी
प्रेमाच्या अंकुरातुन तुझी ती साद व्हावी
तुझ्या वेदनांना ना ती पुन्हा पालवी यावी
दु:ख मुक्तीच्या चक्राला बुध्द गती व्हावी...
कमळाच्या कोमलतेची मधुर धार यावी
द्वेष पिकाची ती उगवण पुर्ण नाश व्हावी
मैत्रीच्या भावनेला बुध्दाची ती गती यावी
करुणेची ती शांती अहिंसा भावना व्हावी...
----------------------------------------
नागपूर, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६
(बुद्ध साहित्यातील प्रेम - सौंदर्यशास्त्र)
No comments:
Post a Comment