🌪️ *महायुध्द....!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
युध्द असो की महायुध्द
हा घडण्याचा इतिहास
कधी विस्तारवाद असतो
तर कधी शक्तीवाद असतो
अर्थात स्व-स्वार्थ जोपासणे
ह्यामध्ये तो अडकला असतो
प्रेम मैत्री करुणा बंधुता
प्राणी मानवताही
ह्या बुध्द गुणांचा अभाव असतो
संबंध पार दुरावले जातात
आणि परिणाम दिसत असतो
मन विध्वंस ! अर्थ विध्वंस !!
सर्व काही बेचिराख झालेले असते
जिकडे तिकडे दिसत असते
फक्त दु:ख ! दु:ख !! दु:ख !!!
राक्षसी भाव शरीरात प्रवेशाने
माणुसचं प्रेतांचे ढीग पाडतो
माणुस हा माणुस नसतो
माणसाचे शरीर बॉडी होते
मढ्यावर घेवुन जातांना
फुलांनी तो सजलेला असतो
कधी तर ते ही वाट्याला नसते
सर्व काही उध्वस्त झालेली
ती एक बेवारस लाश असते
म्हणुन बुध्द दु:खाचे कारण
अज्ञान - अविद्या आहे सांगतात
हे उगीचं नव्हे बरं कां...!!!
आज समस्त संसारात (विश्व)
फक्त एकचं चर्चा दिसुन येते
युध्द की बुध्द
सहज उत्तर माहित असतांना
ही विवाद चर्चा कां ?
तो कृती भाव कां ?
हा एक गंभिर प्रश्न आहे
समस्त विश्व देशाला
आणि माणसालाही...!!!
* * * * * * * * * * * * * *
नागपूर, दिनांक ३१/१०/२०२३
https://youtu.be/ErUljChso3M?si=Vd87tXoqAaVDCzpw
No comments:
Post a Comment