Sunday, 5 November 2023

 🌹 *बुध्दाच्या पथावर... !*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न.‌९३७०९८४१३८


माणसाच्या जीवनातील

लांबचा प्रवास करतांना

निसर्गावर प्रेम करावे

हिरवळ रस्त्यातुन कारने जातांना

हिरव्या वृक्षांनी स्वागत करावे

निष्पाप पक्षांचे गाणे ऐकावे

निसर्ग वातावरणातील

कृत्रीम पाणी बंधा-यावर

झाडांच्या सानिध्यात बसुन

जेवणाचा आस्वाद घ्यावा

जीवनाच्या सुखद आनंदात

मधु चंद्राचे गीत गातांना

मैत्री सोबतीच्या संगे

निसर्गाला आजचा दिवस

जीवन जगण्याचे साक्ष करावे

बुध्द कालीन इतिहासाच्या

प्राचीन विद्या विहार

जाड भींतीवर बसुन 

मनाचा बंध कोरुन घ्यावा

शिल्पकाराच्या ह्या कल्पनेतुन

बुध्दाला त्रिवार शरण जावे

मनोभावे वंदन करावे

बुध्दाच्या पथावर चालतांना

निसर्ग मनाच्या ह्या हिरवळीला

फुलांच्या रंगी बिरंगी रंगातुन

छान असे समर्पित व्हावे

चिरकाल आठवणीकरीता !!!


* * * * * * * * * * * * * * *

नागपूर, ५ सप्टेंबर २०२३

No comments:

Post a Comment