🦋🦋 *दोन फुलपाखरे...!!!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
माझ्या बागेतील झुल्यावर
मी बसलो असतांना
एकसारखा बघतो की
दोन फुलपाखरे
ही संग संग उडत आहेत़
विभिन्न रंगी फुलांचा मध
सोबतचं प्राषण करीत आहेत
ती विभक्तचं होत नाहीत
कधी कधी लव्ह बर्ड ही
असाचं आनंद घेत असतात
त्यांच हे निरागस निष्पाप प्रेम
मी माणसात शोधत असतो
माझ्यासमोर फक्त नी फक्त
प्रश्न उभे झालेले असतात
सम्यक असे उत्तर नसते...!!!
निसर्गाची सुंदरता असणा-या
माझ्या ह्या बागेत
विभिन्न फळ झाडांना
विभिन्न रंगी बिरंगी फुलांना
दैनदिन खत पाणी देतांना
मी हळुवार प्रेमाने
नेहमी गोंजारीतही असतो
माझ्या बागेतील बुध्दाच्या
स्मित हास्यातुन
स्वत:ला हसरे ठेवीत असतो
निसर्गाचे कोमल मन
सुंदर ही निष्पाप चेतना
माझे सच्चे प्रेम आहे
माझी मन प्रेरणा आहे
तो माझा सच्चा मित्र आहे
माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत...!!!
* * * * * * * * * * * * *
नागपूर, दिनांक ३ नोव्हेंबर २०२३
No comments:
Post a Comment