Friday, 21 October 2022

 🫶 *हे राजकिय मित्रा...!*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        मो.न. ९३७०९८४१३८


हे राजकिय मित्रा...!

तु सोबतीला असतांना

खुप काही तारिफ करीत होतास

ईमान-वाद दाखवित होतास

सत्यनिष्ठा जोपासना सांगतांना

तुझा बराच वेळही देत होतास

वाटलं ही सोबत कायमची असेल...!

पण अचानक (?)

दुधात मीठाचा खडा पडला

आणि तुझी भाषा पार बदलुन गेली

तु दुस-या कळपात प्रवेश केलासं

आणि इकडे थोडीसी दुरी ठेवुन

तु दुसरीकडे कुठेचं जाणार नाहीसं

ही खोटी भाषाही तु बोलत होतास

पण तुझा दोहरीपणा ओळखायला 

फार सोपा असा भाव होता

तो सोपा भाव म्हणजे 

तुझी ही बॉडी लँग्वेज....!

तु दुर गेल्याचे तेवढे दु:ख नाही

दु:ख हे तुझ्या खोटे बोलण्याचे आहे

पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे आहे

तुला ती दुसरी नविन सोबत 

कदाचित जास्त आनंद देणारी असेल

तुझे खुप कल्याण करणारी असेल

तर तु खुशाल त्यांच्यासोबत जा

तुला थांबविण्याचे काही कारण नाही

पण सत्य सांगण्याची तु हिम्मत कर

तु आज काही गुलाम नाहीसं

भारतीय संविधानातुन 

तुला सर्व स्वातंत्र मिळालेले आहे...!

पण तु त्या नविन कळपात

स्व-अस्तित्व निर्माण करणार काय ?

तु तिथे खुप मोठा होणार काय ?

हा फार महत्वाचा प्रश्न आहे.

कारण तुझी आपली कळप निष्ठा 

ही कधीच प्रामाणिक राहिलेली नाही

तुला नविन मित्र जवळचे वाटायचे

तु आज अवसरवादी दिसत आहेसं

तु कधीच संतुष्ट राहाणारा नाहीसं

तु कळप फिरणारा सोंगाट्या आहेस

कारण तुझी ही बॉडी लँग्वेज 

सर्व काही सांगुन जात आहे

पण घर हे घरचं असते 

आपले हे आपलेचं असतात

तेव्हा तु आता तरी परत घरी ये

फक्त एक शब्द बोल "सॉरी"...!


* * * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment