Thursday, 13 October 2022

 * *गद्दारांचा इतिहास कधीचं नसतो !*

          *डॉ.  मिलिन्द जीवने 'शाक्य'* 

          मो.न. ९३७०९८४१३८

  

जे नेहमी ईमानी राहिलेत

त्यांनी आपला इतिहास रचला

ज्यांनी स्व: फायद्याकरीता

धोका-वादाची राजनीति केली

आणि स्वत:ला शहाणे समजले

ते कायमचे इतिहास जमा झालेत.

राजा जयचंद हा

गद्दार म्हणुनचं ओळखला जातो

तर चक्रवर्ती सम्राट अशोक

आज ही जगाला इतिहास देतो.

भीमा कोरेगावं हा स्तंभ

महार शक्तीचा इतिहास देतो

तर सौंदर्या मोहीनी मस्तानी ही

पेशवाई स्त्री लंपट कहानी सांगतांना

अत्याचार-वादाचा इतिहास देतो.

द्रोपदी हिचे वस्त्रहरण

कृष्णाच्या (?) धावुन जाण्याने

आज ही थांबलेले नाही

तिचे वास्तव अस्तित्व 

पाच भावाची सामुहिक पत्नी म्हणुन 

आज ही ओळखल्या जात आहे.

रामाने स्व-पत्नी सीता हिला

कुणाच्या तरी सांगण्यावरुन

चारित्र अग्निपरिक्षा देण्यास

बाध्य केल्याचा इतिहास आहे. 

दुर्गा नावाच्या वेश्याने

राजा महिषासुर सोबत

नव रात्र भोगशय्या करुन

वध नाही तर धोक्याने हत्या केली.

वध हा पशुचा होतो

राजा महिषासुर हा पशु नाही

तर प्रतापी राजा होता

आणि व्यवस्थेने नंतर वेश्या दुर्गाला

देवी दुर्गा म्हणुन प्रस्थापित केले.

इकडे सौंदर्याची राणी आम्रपाली

देशाची सेवा करण्याकरीता

ती वैशालीची नगरवधु झाली

राजा अजातशत्रु हा दुश्मन राजा

तिच्या आयुष्याचा प्रेमी झाल्यामुळें

तिच्यावर लागलेल्या लांछनाला

तिने स्वाभिमानाने तोंड दिले

आपले शुध्दत्व सिध्द केले

तिने पळवाट कधीचं शोधलेली नाही

शेवटी ती बुध्दाला शरण गेली.

म्हणुन हे माझ्या प्रिय सखे,

तुला गद्दार जयचंद व्हायचे नाही

धोका देणारी वेश्या दुर्गा बनायचे नाही

मोहिनी मस्तानी ही बनायचे नाही

पाच पांडवाची पत्नी द्रोपदी ही नाही

सिता सारखी अग्नी परिक्षा ही नाही

फक्त तु प्रखर देशभक्त आम्रपाली हो

बुध्द विचारशील आम्रपाली हो

चक्रवर्ती सम्राट अशोकाची वारस हो

त्याचे कारण असे की,

गद्दारांचा इतिहास कधीच नसतो...!!!


* * * * * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment