Friday, 27 May 2022

 👌 *हे अत्त दिपो भव...!*

         *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर

          मो.न.‌ ९३७०९८४१३८


हे अत्त दिपो भव नादेचा तु दीप असा हां

ह्या पावन बुध्द भावनेची ती पहाट आली...


चिड नादाचा तो आलाप गावु नको रे हां

शंकागत गावाची वाट फार जहाल झाली

तुटणा-या मनाचा जोडु डिंक आहे कुठे हां

उध्वस्त गवतीची रात्र फार भयाण झाली...


हे प्रेम सागराचा मोगरा गुलाब सुखद हां

ही क्रोध पल्लवीची वाट चक्रागत झाली

ड्राव ड्राव मंडुकाचा सखा भाव असा हां

विषाक्त जीवाची मैत्री फार जहाल झाली...


हे जोड सागराचा किनारा हवा मना हा

पाखरी किल्लवांची ती आर्त दु:खद झाली

हे विशाल मनाला साद घालावी मिलन ही

ह्या जोडणा-या तारकांची ती सोबत आली...


* * * * * * * * * * * * * * * * 

(नागपूर, दिनांक २७ मे २०२२)

No comments:

Post a Comment