Saturday, 21 May 2022

 🪄 *हे लुकलुक तारकांचा...!*

      *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर

       मो.न. ९३७०९८४१३८


हे लुकलुक तारकांचा हा प्रकाशमान ही

ह्या बुध्द शरण भावाचा एक साद आहे...


उडणा-या पक्षांची दुभंगलेली पंख ही

उंच आकाश झेपाची एक चाहुल आहे

तुटणा-या मनाची ती दुंभगलेली पंख ही

हे कटु नफरत भावाची एक दरारी आहे...


मनाच्या संवेदना ना दुभांगाव्या कधी ही

अस्सल विश्वाचे मधु संबंध तुटणार आहे

हे विश्वासी धागा कच्चा नसावा कधी ही

आयुष्य धुळधाणीची ती एक वाटचं आहे...


ह्या सीमागत क्रोधाची ना मैत्री बरी ही

रक्त जखमेचे दु:ख घाव ना भरणार आहे

हळुवार मनाची ती सुखद चाहुल शोध ही

सम्यक बुध्दाला हा आसमंत शरण आहे...


* * * * * * * * * * * * * * *

(नागपूर, दिनांक २२ मे २०२२)

No comments:

Post a Comment