🌹 *मोगरा पारिजात प्रेमाचा...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर
मो. न. ९३७०९८४१३८
मोगरा पारिजात प्रेमाचा हा गुलाब फुलला
ह्या बुध्दाय फुलांचा सुगंध दिगंतात सुटला...
मखमली तारुण्याचा हा आगाज उठला
ह्या मनसाद अंतरीचा आस लयास मिटला
निसर्ग वादळाचा भयाण चक्रवात फिरला
विचार नाद ना जुळतांना हा ढोल फुटला...
वेदनांच्या वर्षा सरींचा असा कहर उठला
रेशमाच्या धाग्याचा हा कच्चा बंध सुटला
दु:ख नदीचा सागरा मिळतांना पुल तुटला
ह्या पुराच्या थैमामातुन जन जीव मिटला...
हे सुर्याच्या प्रकाशाचा एक किरण दिसला
डुबणा-या आसवांचा सुखद मार्ग खुलला
पंखाच्या जीवाला हा शक्ती किनारा सुचला
ह्या नावे संगे तरण्याचा तो दिलासा भेटला...
* * * * * * * * * * * * * * *
(नागपूर, दिनांक २३ मे २०२२)
No comments:
Post a Comment