Thursday, 15 March 2018

कर्ज बुडव्यांच्या जगात...!

ः😔 *कर्ज बुडव्यांच्या जगात ...!*
        *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपूर*
         मो.न. ९३७०९८४१३८

आमच्या भारतातील
लहान शेतक-यांच्या आत्महत्या
आणि मोठ्या शेतक-यांनी
झालेल्या शेती हानीतुन
उत्पन्न करातुन घेतलेली मोठी सुट
पुनश्च ह्या शासनापुढे
शेती कर्ज माफीची केलेली मागणी
आणि उभारलेला
राजनीतिचा नवा फंडा
अल्प भु-धारकाच्या मृत टाळुवरील
मलिदा खाणा-या लांडग्याची जात
ह्या राजकारणात फोफावत आहे.
आणि मोठ्या उद्दोगपतींनी
उद्दोगधंद्याच्या नावाने
घेतलेले करोडोंचे कर्ज
तसेच विविध बँकांना
लावलेला करोडो - करोडोंचा चुना
आणि भारतीय अर्थव्यवस्था
ही पार खस्ता झालेली असतांना
कर्ज बुडव्यांच्या जगात
सरकार मात्र ही मौनचं आहे !
आणि खरं सांगायचे तर
शेतीवर दिली गेलेली कर्ज माफी
ही देशाला तारणारी नाही
शासन चालवायला लागणारा पैसा
काय आकाशातुन टपकणारा आहे ?
प्रत्येक भारतीयांचा श्रम पैसा
राजसत्तेचे वेश्या-धारी
अतोनात बरबाद करीत असतांना
भ्रष्टाचाराचा कळस गाठुन
भारताच्या अर्थनीतिवर
ते बलात्कार करीत आहेत !
शेती हा उद्योग व्हावा
आणि त्या उद्योग वर्गाला
दिल्या जाणा-या सोई - सवलती
आदींच्या जोरदार मागणीचा
ठेकेवादींनी पाठपुरावा न करणे
आणि कायम स्वरुपातील
डॉ. आंबेडकरांनी दिलेला
सामुहिक शेतीकरणाचा प्रस्ताव
जातीय विषधारी सत्तावाद्यांनी
धुडकावलेला असतांना
सदर प्रस्ताव अमलबजावणीची
कुठलीही अशी कास न धरता
लहान शेतक-यांच्या
आत्महत्या कालचक्राला
निरतंन सुरू ठेवतांना
पुन्हा पुन्हा कर्ज माफीची
ही नविन होत असणारी मागणी
भारतीय अर्थव्यवस्थेची
पुर्णत: कंबरडे मोडणारी आहे...!
आणि दुसरीकडे
भारत देशभक्ती
आणि भारत विकासवादाचा
मोठा - मोठा आव आणणारा
भांडवलवाद्यांचा तो रखेल समुह
असा मौन कां आहे ?
हा माझा खुला प्रश्न आहे...!

* * * * * * * * * * * * * * * *
(भारत राष्ट्रवाद समर्थक)ःः

No comments:

Post a Comment