👌 *बुध्द सत्याचा बोध...!!!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
निसर्ग चक्र संसारातील
प्रात: काल निर्मल मन
प्रेम मैत्री सत्य अहिंसा
प्रज्ञा शील करुणा
स्वातंत्र समता बंधुता न्याय
हा जीवन बोध करतांना
कार्य कारण भाव - प्रतित्यसमुत्पाद
बुध्द सत्याची जाण देतो ....
मनातील दडप आवरण
घालवावे कसे हा अहं प्रश्न
असत्य - दगाबाज जग
रक्ताळलेले हिंसा तांडव
अ-शील भ्रष्टाचार पोखरण
नेहमी आ वाजुन उभे असतांना
तुझा प्रेम मैत्री करुणा हाथ
मनाला शांतीची अनुभुती देतो....
तुझ्या प्रेमाच्या पाशेत
मनाला येणारी शांत झोप
हवी हवीसी असणारी चेतना
परंतु वातावरणातील दुषितता
सर्व काही उध्वस्त करतांना
सुर्योदय किरण उत्सर्ग
माणसाला नित्य जागवतांना
बुध्द सत्याचा बोध करुन जातो ....
--------------------------------------
नागपूर दिनांक २ जुलै २०२६
No comments:
Post a Comment