👌*बुध्द लोकशाहीचा गजर...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
सुर्याचे तेज प्रकाश
आकाशाला गवसनी घालुन
दिवस होण्याची जाणिव देतो
नित्याचा रात्र काळोख
सुर्याचा अस्त करतोचं नां !
आणि तो सृष्टीचा नियम आहे...
परंतु बुध्दाचे धम्म चक्र
रात्र असो वा दिवस
नेहमीचं चेतवतांना दिसते
निरंतर प्रकाशमान असते
प्रेम मैत्री शांती अहिंसा
करुणा बंधुता संदेश देते...
बुध्दाचे ते धम्म चक्र
चक्रवर्ती सम्राट अशोकाने
राजाश्रय देवुन
गतिमान ठेवलेले होते
पुढे बाबासाहेबांनी
१४ आँक्टोबर १९५६ ला
पुनश्च गतिमान केल्याचा
एक इतिहास आहे....
काळानुरुप पृथ्वीतलावर
ही दोन महामानव झाले
धम्मचक्र अनुवत्तन
आपल्या लाखो अनुयायांना
समता पथ सांगतांना
जगाला माणुसपण दिले
इतकेच काय
भारतीय संविधानातुन
बुध्द लोकशाहीचा गजर
हा गतिमान करतोचं आहे !!!
-----------------------------------
नागपूर, दिनांक ८ एप्रिल २०२६
No comments:
Post a Comment