📓*ताराचंद्र खांडेकर लेखन संकलन पुस्तक - वाङमयीन चिंतन आणि संवाद !!! नविन संशोधन इतिहास शोध वाङमयाचे संदर्भ हे जोडल्यास ती संदर्भ पुस्तक होईल !*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपुर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटींग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ, महु म.प्र.
बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक
आंतरराष्ट्रिय परिषदेचे संशोधन पेपर परिक्षक
मो.न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२
वरिष्ठ दलित साहित्यिक आणि भाष्यकार *ताराचंद्र खांडेकर* लेखन संकलन संदर्भित - *"आंबेडकरनिष्ठ वाङमय विमर्श / वैश्विक जीवनमूल्यांचा संघर्षनामा"* ह्या दोन पुस्तकावर *माझी समिक्षा* ही मिडियामध्ये ह्यापुर्वी प्रकाशित झालेली आहे. आणि *ताराचंद्र खांडेकर* ह्यांच्या तिस-या पुस्तकाची समिक्षा करतांना ब्राम्हणी विचारधारा परंपरेने चालत आलेल्या *"ब्राम्हणी वाङमय षद्म इतिहासाला"* छेद देणे मला महत्वाचे वाटले. कारण आमचे बरेच *दलित / आंबेडकरी लेखक* हे लेखन करतांना सदर ब्राम्हणी संदर्भ देत असतात. माझ्या समोर प्रथम प्रश्न होता तो हा की, *"बुध्द कालखंड / बुध्द प्रभाव सम्राट कालखंड ह्यामध्ये ब्राम्हण वर्ग विद्ममान होता काय? "* दुसरा अहं प्रश्न होता की, *""चक्रवर्ती सम्राट अशोक शिलालेखात / अशोक दरबारात असलेला युनानी विद्वान मेगास्थनिज ह्यांच्या इंडिका ह्या ग्रंथामध्ये / वा इसवी पहिल्या शतकातील एरियन ह्यांच्या इंडिका ग्रंथामध्ये ब्राह्मण वर्ग हा संदर्भ आहे काय ?"* जर सदर कालखंडात ब्राम्हण वर्ग संदर्भ नसल्यास (?) *"वैदिक धर्म कालखंड / ब्राम्हण धर्म कालखंड / हिंदु धर्म (?) कालखंड केव्हा आणि कसा आला?"* इसवी सातव्या - आठव्या शतकातील विद्वान *"अलबरुनी हा काय प्राचिन इतिहास सांगतो आहे?"* आणि प्राचिन वाङमय / साहित्य उगम इतिहासाकडे जातांना *"लिपी / भाषा / अक्षर ह्याचा उगम हा कधी आणि कसा कसा होत गेला?"* भाषा - साहित्य लिखाणाचे खरे प्रवर्तक कोण मान्यवर होते... इत्यादी. आता सदर प्रश्नाचा सक्षिप्त आढावा हा घेवु या !!! कारण *ताराचंद्र खांडेकर* ह्यांचे सदर पुस्तक हे संकलन पुस्तक (भाषणे) असल्याने पुस्तकाला काही मर्यादा आहेत. सदर विषयावर *"संदर्भ पुस्तक"* लेखन असते तर खांडेकरांनी ती व्यापकता लिहिली असती.
*"सिंधु घाटी सभ्यता लिपी"* (इ. पु. ३३०० - १९००) ही वाचली वा समजली गेली नाही. बुध्द काळ आणि बुध्द प्रभाव काळातील *"धम्म लिपी"* (ब्राम्ही लिपी) ही वाचली, समजली, उमगली गेलेली आहे. तसेच खरोष्ठी लिपी, शंख लिपी, चित्र लिपी, शारदा लिपीपासुन *"देवनागरी लिपी"* ह्या पुढे उदयास आल्यात. बुध्द काल आणि बुध्द प्रभाव सम्राट कालखंडात *"पाली - प्राकृत भाषा"* ही लोकभाषा होती. बुध्दाच्या महापरिनिर्वाणानंतर बुध्द धम्मात *"हिनयान - महायान संप्रदाय"* असे विघटन झाले. शब्द मर्यादेमुळे *"बुध्द संगिती इतिहास"* विषय हा आवरता घेतो. बुध्द प्रभाव सम्राट कालखंडात *"वंशव्यवस्था"* होती. *"जाती व्यवस्था"* नव्हती. जसे - शाक्य वंश / कोलिय वंश / मौर्य वंश / हरयक वंश / पाल वंश / सुंग वंश..... इत्यादी. बुध्द कालखंडात *"बम्हन"* हा शब्द *"विद्वान / समन / श्रमण"* ह्या अर्थाने विद्यमान होता. बुध्द प्रभाव कालखंडात धम्म हा *"धारेति ति धम्म |"* (धारण करतो तो धम्म) ह्या अर्थाने रुढ होता. *इपु तिस-या शतकात* चक्रवर्ती सम्राट अशोक *मेगास्थनिज* ह्या युनानी विद्वनानी *"इंडिका"* हा ग्रंथ लिहुन सम्राट अशोकाच्या शासन व्यवस्थेचे वर्णन करतांना *"सात वर्गाचा"* उल्लेख केलेला आहे. जसे की - विद्वान वर्ग / शेतकरी वर्ग / पशुपालक वर्ग / कारागीर वर्ग / सैनिक वर्ग / दुकानदार वर्ग / गरिब वर्ग. तसेच इसवी पहिल्या शतकातील *एरियन* ह्या विद्वानानेही आपल्या *"इंडिका"* ग्रंथात मेगास्थनीज ह्यांच्याच विचारांची री ही ओढलेली आहे. *चक्रवर्ती सम्राट अशोक* ह्यांनी त्यांच्या शिलालेखात *"ब्राम्हन वर्ग / चाणक्य ब्राह्मण "* ह्यांचा कोणताही संदर्भ नाही. प्राचिन भारताचे नाव *"जंबुद्विप"* असल्याचा संदर्भ हे सम्राट अशोक शिलालेख देतो. ब्रहद्रथ मौर्य ह्याची हत्या *पुष्यमित्त सुंग* ह्याने सत्तालालसा भावनेतुन केली होती. *पुष्यमित्त सुंग* हा सुध्दा बौध्द सम्राट असतांना तो *"ब्राह्मण"* असल्याचा चुकीचा इतिहास लिहिला गेला आहे. आपल्या देशाचे *"इंडिया"* नाव हे सिंधु घाटी संस्कृतीच्या *"इंडस"* ह्या शब्दावरुन आलेले नसुन सम्राट अशोक कालखंडातील *"इंडिका"* ह्या ग्रंथावरुन आलेले असावे, असे वरील प्रमाणावरुन म्हणता येईल. दुसरे असे की *कालीदास* रचित संस्कृत काव्य (क्लासिकल) *"शकुंतल"* मधिल पात्र *भरत* (दुष्यंत - शकुंतला पुत्र) वरुन आपल्या देशाचे नाव *"भारत"* पडले, असा जावई शोध ही लावला गेला आहे. वास्तविकता अशी की *"कालीदासाचा जन्म - मृत्यु कुठे झाला???"* हे मात्र एक कोडे आहे. कालीदास हा काल्पनिक कवि होता काय ? कालीदास ह्याच्या लिखाणात *"अपभ्रंश भाषा"*(इसवी ८ - १२ वी शती) प्रभाव असल्याचे दिसुन येते. *"कालीदास हा भोगवाद साहित्याचा उद्गाता आहे."*
बुध्द धर्म हा *"हिनयान - महायान"* संप्रदायात विभाजित झाल्यानंतर हिनयान संप्रदायानी बुध्दाची *"पाली भाषा परंपरा"* ही कायम ठेवली. लिपी ही *"धम्म लिपीच"* होती. तर महायान संप्रदायाने पाली भाषेत संस्कार करुन *"हिब्रु संस्कृत भाषा"* (इसवी पहली शती) हिला जन्माला घातले. लिपी मात्र *"ब्राम्ही लिपी"* होती. इसवी १२ - १३ व्या शतकात *"वैदिक धर्माचा उदय"* झाल्यानंतर हिब्रु संस्कृत भाषेवर संस्कार होवुन *"क्लासिकल संस्कृत भाषा"* ही उदयाला आली. लिपी मात्र *"देवनागरी लिपी"* होती. देवनागरी लिपीचे *"प्रथम प्रारुप इसवी ११००"* मध्ये अस्तित्वात आले असले तरी व्यवहारात ती *"इसवी १७९६"* मध्ये अस्तित्वात आली. इसवी ८ - १२ वी शती ह्या कालखंडत *"अपभ्रंश भाषा"* प्रचलित होती. इसवी १२ - १९ ह्या कालखंडात *"आदि हिंदी भाषा"* प्रचलित होती. *"पाली - प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदि हिंदी होय. "* इसवी १२ व्या शतीतील *अब्दुल रहमान* (अद्दहमान) हा आदि हिंदीचा पहिला कवि (संदेश रासक) आहे. *संत कबिर* (१३९९ - १५१२) हे सुध्दा आदि हिंदी कवि होते. दोघांची ही मुस्लिम धर्म (जुलाह) स्विकारण्यापुर्वीची जात ही *"कोळी > कोली > कोलीय"* होती. ह्यांचा व्यवसाय *"विणकाम"* होता. कोलीय ही जात सिध्दार्थ गौतम ह्यांची पत्नी यशोधरा ही *"कोलीय वंश"* निगडीत मानली जाते. इसवी १९ व्या शतकात *"आधुनिक हिंदी भाषा"* ही उदयास आली. संत कबिर म्हणतात *"जाति न पुछो साधु की, पुछ लिजिए ज्ञान | मोल करो तलवार का, पडा रहने दो म्यान ||"* (अर्थात - सज्जन माणसाची आपण जाती न विचारता, त्याचे ज्ञान बघायला हवे. तलवारीची किंमत असते, न की तिच्या ह्या म्यानीची.) ह्या कालखंडात *"जातीव्यवस्था"* खुप रुढ झाली होती, असे म्हणता येणार नाही. परंतु इसवी १६ व्या शतकात म्हणजे *गोस्वामी तुलसीदास* (१५३२ - १६२३) ती खुप प्रबल अवस्थेत दिसुन येते. तुलसीदास हे *"रामचरित मानस"* मध्ये म्हणतात *"ढोल गवार शुद्र पशु नारी | सब ताडन के अधिकारी ||"* अर्थात स्त्री हिचा दर्जा सुध्दा हिन गणला जात होता.
बुध्द धर्मातील *महायान* संप्रदायाने इसवी पाचव्या शतकात *"वज्रयान"* संप्रदायाला / आणि इसवी आठव्या शतकात वज्रयान द्वारा *"तंत्रयान"* संप्रदायाला जन्माला घातले. इसवी नवव्या शतकात *शंकर* (इसवी ८५०) नावाच्या व्यक्तीचा जन्म होतो. दहाव्या शतकात तो *"प्रच्छन्न बौध्द"* म्हणुन परिचीत झाला होता. ह्याच कालखंडात *"महायान - वज्रयान - तंत्रयान"* ह्या संप्रदायाने *"शैव पंथ / वैष्णव पंथ / साक्त पंथ"* ह्याला जन्माला घातले. आणि शंकर नावाच्या व्यक्तीने मग स्वत:ला *"आदि शंकराचार्य"* घोषित करुन *"महायान बुध्द विहारावर"* अधिपत्य करुन *"चार पीठाची"* निर्मिती केली. *"चार वेद* हे इसवी ११ वा १२ व्या शतकात *"चार पीठातुन"* कागदावर रचल्या गेले. वेदाचा उगम हा *"वेदना"* ह्या शब्दापासुन झाला. कागदाचा शोध हा *"इसवी दहाव्या शतकात चीन"* ह्या देशात लागला होता. बुध्द इतिहास हा *"शिलालेख / ताडपत्र / ताम्रपट"* ह्यावर अंकित आहे. *"वैदिक धर्म उगम"* ही ह्याच कालखंडात झाला. पुढे तो *"ब्राह्मण धर्म"* म्हणुन परिचीत झाला. सदर कालखंडात *"विक्रम सवंत* इ. पु. ५७ आणि *"शक सवंत"* इसवी ७८ हे *"बौध्द कँलेंडर"* प्रचलित होते. *"ग्रेगारियन कँलेंडर"* हे येशुच्या जन्म आधारावर प्रचलित झाले होते. मुस्लिम आदी शासक आगमनानंतर *"हिजरी कँलेंडर"* हे इसवी ६२२ मध्ये प्रचलित झाले. बुध्द धर्माचे *"संप्रदायात विभाजन / शैव आदी पंथाची स्थापना / आदि शंकराचार्य उदय / वैदिक धर्म - ब्राह्मण धर्म उदय / मोगल आदि शासकाचे आक्रमण"* ह्या कारणामुळे *"इसवी दहाव्या शतकानंतर बुध्द धर्म अवनतीला"*:सुरुवात झाली. इंग्रज आदी शासकांचे *"भारतावरील आक्रमण"* हा इतिहास सांगितला जात असला तरी *ब्राम्हण धर्म अवनतीचा इतिहास"* हे मात्र कोडे आहे. अल्पसंख्यक ब्राम्हण समुह हा *"हिंदु धर्मीय"* कसा झाला ? हा सुध्दा प्रश्न आहे. अनुसुचित जाती / जनजाती सन १९११ मध्ये *"अहिंदु वर्ण"* गणले जात. सन १९३१ ची इंग्रज शासक ह्यांनी केलेली जनगणना हा पुरावा बोलका आहे.
तद्वत कालखंडात अजुन तिन लिपी ह्या प्रचलित होत्या. *चित्र लिपी* (जसे - डोळा) / *भाव लिपी* (जसे - डोळ्यातील आसवे) / *ध्वनी लिपी.* अक्षर शोध हा *"बुध्द काळाची देण"* आहे. *"क"* ह्या अक्षर संदर्भातचं बोलु या. सम्राट अशोक कालखंडात *"क"* हे (+) हे चिन्ह / पुढे (क्रुस) चिन्ह / पुढे (त्याला उकार) चिन्ह आणि वाकाटक कालखंडात (त्यावर विलांटी) / अश्या अवस्थेतुन आजचे *"क"* अक्षर उगम झाल्याचे दिसुन येईल. मराठी भाषा उगम *"सातपुडा पर्वत रांगा पासुन पश्चीमेकडे"* सांगितले जात असुन *"पाली - प्राकृत - अपभ्रंश भाषा"* ह्या टप्प्यातुन उत्कांत झालेली आहे. मराठी भाषा ही *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी / व-हाडी मराठी / कोल्हापुरी मराठी"* हया भागात विभागली आहे. मग *"मराठी भाषा साहित्याचे एकसंघत्व"* आहे कुठे? *"कुणाला उच्च / कुणाला हिन"* समजण्याचे मापदंड कोणते आहे? मराठी भाषेचा शिलालेख इसवी ७०५ सालचा पुणे जवळील *तळेगाव ढमढेरे* येथे / इसवी १०१२ सालचा रायगड जिल्हा अलिबाग तालुक्यातील *अक्षी* येथे / इसवी १०१९ सालचा सोलापूर जिल्हातील *हत्तरसंग कुडल* येथे / इसवी १०३९ सालचा कर्नाटक राज्यातील *श्रवणगोळबेळ* येथे सापडल्याची नोंद आहे. मराठी भाषा ही *"अभिजात दर्जा"* पात्र करण्यासाठी (दोन हजार वर्ष इतिहास) बुध्द प्रभाव कालीन *"नानेघाट शिलालेख"* आधार घ्यावा लागल्याचा इतिहास आहे. मराठी ही दुस-या निकसात (भाषा ही ओरिजिनल असावी) बसत नसतांनाही *"मराठी भाषेला अभिजात दर्जा"* दिला गेला, हा भाग वेगळा आहे. *छत्रपती शिवाजी महाराज* साम्राज्यात (१६३६ - १६८०) मराठी भाषेतील शिलालेख नसणे, ह्याला काय म्हणावे? *"क्लासिकल संस्कृत भाषेतील शिलालेख"* असणे, ब्राम्हण्य सत्तेचा प्रभाव सांगुन जातो. शिवाजी महाराजांचा मृत्यु हा विष प्रयोगामुळे झाल्याचे बोलले जाते. *संभांजी महाराजांच्या शरिराचे तुकडे"* केल्याची इतिहासात नोंद आहे. ह्या विषयावर पुन्हा कधी तरी चर्चा करु या. शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु हे *संत तुकाराम महाराज*' होते, हा इतिहास आहे. परंतु हा खरा इतिहास लपवुन *आदिलशाही* (मुस्लिम शासक) साम्राज्याचा हेर (जासुस) *रामदास स्वामी* (१६०६ - १६८२) ह्याला शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु प्रचार केला गेला, ह्याला काय म्हणावे? रामदास स्वामींचे आदिलशहाला लिहिलेले पत्र आहे - *"पायाचा मी दास | शाह अर्जी ऐकावी || सिवाजीच्या राज्याची | धुळधान व्हावी || दासाचाही दास आपुला | मी रामदासी || दरबार आपुला आदिलशाही | हीच माझी कासी ||"* (भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे व्हाल्युम ६१ न. १ जुलै १९८२ अंक) परंतु रामदास स्वामीचे नातलग असलेले / वयाने मोठे असलेले *संत एकनाथ महाराज* (१५३३ - १५९९) हे बुध्दाला शरण गेलेले असल्यामुळे अस्पृश्य होतात, हे समजुन घेणे गरजेचे आहे. एकनाथ महाराज (अभंग २५६०) म्हणतात *"नवबा बैसे स्थिररुप | तया नाम बौध्दरुप || संत तया दारी | तिष्ठाताति निरंतरी ||"* शिवाजी कालखंडातील *संत तुकाराम* (२१/०१/१६०८ - १९/०३/१६५०)(अभंग ४१६०) म्हणतात *"बौध्द अवतार माझिया अदृष्टा | मौन्य मुखे निष्ठा धरयेली ||"* तुकाराम महारांजांचे बुध्दावर अजुन काही अभंग आहेत, शब्दमर्यादा असल्याने पुढे चर्चा करु या.
*"प्राचिन बुध्द साहित्य तसेच काही मान्यवर"* संदर्भात ह्यापुर्वीच्या दोन समिक्षेत सदर संदर्भ असल्याने ह्यावरील चर्चेला विराम देतो. महानुभव पंथाचे *चक्रधर स्वामी* (११९४ - १२७४) ह्यांचे "लीळा चरित्र" हा मराठी ग्रंथ साहित्यातील *"आद्य ग्रंथ"* असण्या संदर्भाने काही विवादही असु शकतात. सदर कालखंडात चक्रधर शिष्यांनी *"बुध्द मुर्ती भंजन"* करीत असतांना *चक्रधर स्वामीं* ह्यांनी सदर कृत्य न करण्याचा संदर्भ आहे. मग १२ व्या शतकातील महानुभाव पंथी (?) *मुकुंदराज (विवेकसिंधु) / संत ज्ञानेश्वर (ज्ञानेश्वरी)* (१२/०८/१२७५ - २/१२/१२९९) ह्यांना *"आद्य कवि"* ही उपाधी कशी दिली गेली? हा अहं प्रश्न आहे. ज्ञानेश्वर महाराज ह्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेले *चक्रधर स्वामी / नामदेव महाराज - शिंपी (१६/१/१२७० - ३/०७/१३५०) / संत चोखामेळा - महार (१२७३ - १३३८) / संत जनाबाई - शिंपी (१२५८ - १३५०)* ही वरिष्ठ संत *"मराठी आद्य कवि"* कां घोषित केले गेलेले नाहीत ? हा प्रश्न आहे. कारण चक्रधर स्वामी सोडुन *"अन्य तीन वरिष्ठ कवि हे बुध्दाला शरण'* गेले होते, हे कारण आहे काय ? ह्याशिवाय *संत एकनाथ महाराज (ब्राम्हण) / संत जगनाडे महाराज (तेली) / संत नरहरी सोनार (सोनार) / संत सोयरा बाई - संत निर्मलाबाई - संत कर्ममेळा (महार) / महापति बुवा (ब्राम्हन) / तुकाराम महाराज (वाणी)* ही तमाम संत बुध्दाला शरण होती. सदर संताचा मार्ग अलग आहे, हे मान्यही करता येईल. पण ह्या संतावर खुप अन्याय झालेला आहे, हे सत्य मान्य करावे लागेल. संत नामदेव महाराज अभंगात (२१०५) म्हणतात, *"मध्ये झाले मौन, देव निज घ्यावी | बौध्द ते म्हणोनी, नावेरुप ||"* संत जनाबाई अभंगात (१०९६) म्हणते, *"व्रत भंगासाठी बौध्द अवतार | झाला दिगंबर अवनिये ||"* (१०९८) *"ऐसा कष्टी होऊनी, बौध्द राहिलासी ||"* महापतीबुवा ताहाराबादकर अभंगात (५७-९०) म्हणतात, *"आणु कलियुग प्रत्यक्ष | पाषाणरुपी | बौध्दरुपे असता श्रीपती | जनासी दाखवुनी जाना प्रचिती | वाढविली किर्ती संताची |"* ह्या सर्व संताच्या अभंगावर बरेच काही लिहिता येईल, परंतु शब्द मर्यादेमुळे ह्या विषयावर पुन्हा कधी तरी चर्चा करु या.
*ताराचंद्र खांडेकर*:ह्यांच्या "वाङमयीन चिंतन" ह्या पुस्तकात वरील *"विषय संदर्भ"* असल्याने सदर विषयाचा उहापोह करणे गरजेचे होते. बुध्दाने *"कार्यकारणभाव"* सांगतांना म्हटले की, *"इदं सति इदं होति | इदं असति इदं न होति ||"* (अर्थात - कारण असेल तर कार्य होते, कारण नसेल तर कार्य होत नाही.) हा संदर्भ खांडेकरानी दोन - तिन ठिकाणी प्रयोग केलेला आहे. खांडेकराच्या सदर पुस्तकातील केंद्रबिंदु हा केवल *"दलित साहित्य"* असल्यामुळे *"दलितत्व"* भाव आम्ही मिरवावे काय? हा प्रश्न आहे. *"गरिब वर्ग"* ही प्राचिन काळापासुन चालत आलेली एक परंपरा आहे. परंतु प्राचिन कालखंड हा *"बौध्द साहित्याचा"* इतिहास परिचय देतो. *"दलित साहित्याचा"* इतिहास परिचय नाही. बुध्द असो वा बाबासाहेब ह्यांनी व्यवस्थेविरुध्द *"बंड / विद्रोह"* (Uprising / Reblian / Revolt) केले होते काय? हा प्रश्न सहज उत्पन्न होतो. बाबासाहेब ह्यांना *"संघर्ष / कठिण प्रयास"* (Struggle / Conflict) हा शब्द अभिप्रेत होता. बाबासाहेब ह्यांनी त्यांच्या आंदोलनाला *"सत्याग्रह"* असे योग्य नाव दिलेले होते. (जसे - महाड सत्याग्रह / मंदिर सत्याग्रह) बाबासाहेबांना *"रक्तविहिन क्रांती"* अभिप्रेत होती. म्हणुन त्यांनी *"बुध्दाचा"* स्वीकार केला, *"मार्क्सवाद"* नाही. *"गांधीवाद"* नाही. खांडेकर प्रकरण १ मध्ये म्हणतात, "*आजच्या ग्रामिण समाजरचनेचा विचार करता पुरातत्व हिंदु संस्कृतीचे जे अवशेष उत्खननात प्राप्त झालेले आहेत त्यावरुनही नागरी संस्कृतीच्या अस्तित्वाची जाणिव होत असली तरी खरा भारत खेड्यात राहातो.*" हिंदु धर्म संस्कृतीचे कोणतेही अवशेष सिंधु घाटी सभ्यतेमध्येही आढळुन आलेले नाही. सिंधु घाटी सभ्यता ही अत्युच्च विकसित नगरीय सभ्यता होती. *"हिंदु धर्म"* हे नामकरण *"मोगल"* काळातील उपज आहे. *"वैदिक धर्म - ब्राम्हण धर्म - हिंदु धर्म असे स्थित्यंतर बाबासाहेब कोलंबो"* येथिल भाषणात सांगुन गेले. तसेच *"ब्राम्हण धर्म - हिंदु धर्म"* हे अलग अलग समुह होते. *"ब्राम्हण वर्ग"* हा विदेशी असल्याचा संदर्भ हा मनुस्मृती (श्लोक २४) / बाल गंगाधर टिळक / मोहनदास गांधी / जवाहरलाल नेहरु / लाला लजपतराय / पंडित श्याम बिहारी मिश्रा / काका कालेलकर / धर्मानंद कोसंबी / राहुल सांस्कृत्यायन / स्वामी दयानंद सरस्वती ह्यांचे संदर्भ ग्रंथ आहेत.
*"ब्राम्हणशाही"* संदर्भात डॉ.बाबासाहेब म्हणतात, *"ब्राम्हणशाही ह्या शब्दाचा अर्थ स्वातंत्र, समता व बंधुता या तत्वाचा अभाव, असा मला अभिप्रेत आहे. या अर्थाने त्याने सर्व बाबामध्ये कहर माजविलेला असुन ब्राम्हण तिचे जनक असले तरी आता हा अभाव केवळ ब्राम्हणापुरताच मर्यादीत राहिलेला नाही. या ब्राम्हणशाहीचा सर्वत्र संचार झालेला असुन तिने सर्व वर्गाचे विचार व आचार नियंत्रित केले आहेत, ही निर्विवाद गोष्ट आहे. "* (मनमाड, १३ फेब्रुवारी १९३८) ही गोष्ट बाबासाहेब ८८ वर्षापुर्वी सांगुन गेले असुन तिला थांबविणे हे शक्य नाही.अत: तो आपला विषय असता कामा नये. *"बाबासाहेब आंबेडकर हा विचार (Thoughts) आहे की तत्वज्ञान (Philosophy)"* हा विषयही ज्याच्या त्याचा बुध्दीचा आकलन विषय आहे. परंतु *"बाबासाहेब ही चेतना आहे"* हे सर्वांना स्वीकार्य आहे. कारण बाबासाहेबांनी संविधानात (अनुच्छेद १४) *"समानता"* हा मुलभुत अधिकार देतांना *"एक व्यक्ति - एक मत - एक मुल्य"* ह्या संकल्पनेला अंगिकृत केले आहे. *"प्रजातंत्र भारताची"* कल्पना साकार केली. ताराचंद्र खांडेकर हे प्रकरण १ मध्येच म्हणतात की, *"बौध्द तत्वज्ञान हे लोकशाही मुल्ये निर्माण करण्याची एक महत्वपुर्ण शक्ती आहे, असे मान्य करुन तिला भारतीय जीवनात रुढ करण्याची बाबासाहेबांची मनिषा होती."* ताराचंद्र खांडेकर हे प्रकरण ५ मध्ये म्हणतात, *"आंबेडकरवाद स्वीकार म्हणजे धर्मनिरपेक्षतावाद स्वीकारणे होय. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवर्तीत केलेल्या बुध्दाच्या धम्माचे स्वरुप आध्यात्मिक नाही, तर त्या तत्वज्ञानाला सामाजिक, आर्थिक, राजकिय आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे."* ताराचंद्र खांडेकर हे प्रकरण ८ मध्ये म्हणतात, *"बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवर्तीत केलेली धम्मक्रांती विज्ञाननिष्ठ धारणांनी परिवर्तित झाली आहे. ती सम्यक क्रांती असल्याने सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक असे वेगवेगळे आयाम आम्हाला समजले पाहिजेत."* असे असतांना प्रकरण ४ मध्ये ताराचंद्र खांडेकर म्हणतात की, *"मी स्वत:ला दलित साहित्यिक म्हणुन संबोधण्यात गौरव मानतो. त्याची कारणे केवळ सामाजिक किंवा जातीय वा वर्णीय नाहीत. मला स्वत:ला बौध्द साहित्यिक म्हणता आले असते. परंतु त्याऐवजी मी दलित साहित्यिक समजणे जास्त संयुक्तिक मानतो."* ह्या संदर्भात ताराचंद्र खांडेकर हे कुठे तरी एक निर्णय घेतांना दिसुन येत नाहीत.
ताराचंद्र खांडेकर हे प्रकरण ६ मध्ये म्हणतात, *"भारतातील कोणत्याही भाषेतील साहित्याचा आपण अभ्यास केला तरी आपल्या निदर्शनात येते की हे साहित्य आजही 'रामायण' व 'महाभारत' याच्यापुढे गेलेले नाही...... "* खांडेकरानी सदर विधान टीव्ही मालिका संदर्भाने केले असल्यास हा भाग अलग आहे. *"रामायण, महाभारत"* हे ब्राम्हण्यवादी कविच्या कल्पनेतील महाकाव्य असुन सदर काव्याला वास्तव स्वरुप देण्यात आलेले आहे. आणि भारतीय मानस पटलावर ते बिंबीत केले गेले असतांना माणसाच्या मानसिक गुलामीचा तो परिपाक आहे, हे समजुन घेणे गरजेचे आहे. *ताराचंद्र खांडेकर* हे प्रकरण ६ मध्ये बाल गंगाधर टिळक ह्यांचे पुत्र *गंगाधरपंत* ह्यांचा संदर्भ आहे. गंगाधरपंत ह्यांचा मृत्यु (आत्महत्या) हा बाबासाहेबांना वेदना करुन गेला. सदर प्रकरणात खांडेकर म्हणतात की, "*दलित साहित्यिक हा आंबेडकरवादीचं असतो हे नेहमी सांगण्याची गरज नाही."* ह्या संदर्भाने दलित साहित्यिक *शरणकुमार लिंबाळे* ह्यांना *"सरस्वती पुरस्कार"* आपल्या दिवाणखाण्यात ठेवण्यात गौरव वाटतो, त्याचे काय? पुर्वाश्रमीचा दलित कवि *लोकनाथ यशवंत* हा स्वत:ला *"वादीहिन"* म्हणवुन घेतो / आंबेडकरी म्हणवणारे त्याला *"पुरस्कार देवुन गौरव* करतात, त्याचे काय? पुर्वाश्रमीचे दलित कवि *प्रा. यशवंत मनोहर"* हे केशवसुत, मार्क्स ही सांगतात / आणि *"इहवादी"* असल्याचे बोलुन जातात, त्याचे काय? *प्रा रावसाहेब कसबे* हे आंबेडकरवादाला *"गांधीवादाची फोडणी* देतात, त्याचे काय? आमचे मित्र *प्रा. प्रदिप आगलावे* हे पुरस्काराकरिता सनातनी *गिरीश गांधी शरण* जातात, त्याचे काय? रिपब्लिकन संस्कृतीला उत्तर नागपुरातुन हद्दपार करणा-या *कांग्रेस हरिजन आमदार डॉ. नितिन राऊत* हे भोजनदान नावाने *"भिकारवाडा संस्कृती"* राबवुन *"दीक्षाभुमी गंदगीचे शिल्पकार"* झाले, त्याचे काय? आंबेडकरी सांगणारे माजी सनदी अधिकारी *इ झेड खोब्रागडे* हे संविधानाला *"साहित्य श्रेणीत"* समाविष्ट करतात, त्याचे काय? *"जागतिक आंबेडकरवादी साहित्य* नावाने विदेशीवारी व्यापार करणारे *प्रा. दिपक खोब्रागडे* ह्याच्या विदेशवारी व्यवसायाचे काय? अशी असंख्य प्रश्न आहेत. *ओशो रजनीश* वादी प्रवृत्तीच्या विकृतीने उद्या पावन *"दीक्षाभुमीला भोगपुरम्"* केंद्र केल्यास समाजाने शांत बसावे काय? हासुध्दा प्रश्न आहे. सरते शेवटी *ताराचंद्र खांडेकर* ह्यांच्या प्रकरण १० मधील शब्दांनीच समिक्षा ही आटोपती घेतो. खांडेकर म्हणतात, *"बाबासाहेब आंबेडकरांनी अभिसर्जित केलेली सम्यकक्रांती अजुनही पुर्णार्थाने आम्ही यशस्वी केलेली नाही. कारण आमच्या मानसिकतेत आणि वैचारिकतेत असलेले द्वंद्व होय."* जयभीम !!!
----------------------------------------
▪️*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
नागपूर, दिनांक २९ एप्रिल २०२६
No comments:
Post a Comment