👀*मनातील आसवांना...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
मनातील आसवांना
मोकळी अशी स्वतंत्र वाट
सहजपणे करीत जाणे
संभव आहे काय ?
कारण ती आसवे
दृश्य स्वरुपाची नाहीत
आपण नेहमीचं
डोळ्यांच्या आसवांना
बघत आलो आहे
मग ते आनंद अश्रु असो
दु:ख अश्रु असो
विरह अश्रु असो
वा कोणतेही अश्रु असो
पण मनातील आसवांच्या
ह्या वेदनांचे काय ?
परंपरेने नागवला गेलेला
शोषित हा समाज
मुकनायक बहिष्कृत असतांना
बाबासाहेबांनी
जनता ही जाणिव दिली
आणि प्रबुध्द भारत
ह्या दिशेकडे घेवुन जातांना
बुध्दाचा हात हा हातात घेतला
पन्नास साठ वर्षाच्या
अल्पश्या ह्या कालखंडात
शोषक वर्गाची बरोबरी करतांना
बाबा तुम्ही दिलेले ते बुध्द चक्र
आम्हाला पेलवता आले काय ?
हा अनुत्तरीत प्रश्न आहे
अत्त दिपो भव
बुध्दाचा तो महान संदेश
आम्हाला उमगला आहे काय ?
ह्या प्रश्नाचे उत्तर शोधतांना
बुध्दाचे धम्म चक्र
मागे तर घेवुन जात नाही नां !
कारण मनातील आसवांची भाषा
अजुन आम्हाला उमगली नाही
आम्ही ती भाषा समजण्याचा
कधी प्रयासही केला नाही
फक्त आम्ही मदमस्त आहोत
आमच्या ह्या जगात !!!
------------------------------------
नागपुर दिनांक ४ एप्रिल २०२६
No comments:
Post a Comment