Saturday, 21 March 2026

 🌹*स्वप्नात आलेली ती कोरोना !*

     *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      मो. न. ९३७०९८४१३८


कालच्या त्या धकाधकित

सर्व काही कामे पार पाडल्यावर

सहज ऑफिस खुर्चीवर

माझ्या डोळ्यानी विसावा घेतला 

आणि अक्षरशः कोरोना (व्हायरस)

ही माझ्या स्वप्नात आली

आणि हळुवारपणे मला ती म्हणाली 

चल आपण प्रेम करु या !

तु आज एकटा निवांत दिसतोस

आणि मी सुद्धा एकटी निवांत आहे....

मी म्हणालो 

अगं आज तु कशी काय फ्री आहेसं ?

चीन देशातुन तु जगात वावरतेसं

आणि समस्त जग पालथे घातलेसं

माझ्या भारताला ही सोडले नाहीसं !

तेव्हा ती म्हणाली 

अरे हो, तुझे हे बरोबर आहे

पण भारत देशाचे कर्जबाजारी होणे

सोबत जातीव्यवस्था जोपासत असतांना

मला मानवतावाद कधी दिसलाचं नाही

मला वाटले ही छान भुमी आहे

माझ्या व्हायरस लागणीला....

परंतु काल बुध्द दर्शन झाले

विश्व शांती अहिंसा संदेश 

बुध्दाने जगाला दिलेला आहे 

आता वाटले येथे थांबायला नको

म्हणुन मला निवांत वेळ मिळाली

तुझ्याशी बोलायला - प्रेम करायला

वरुन तु डॉक्टर ही आहेसं

माझी लागणं तुला होवु देणार नाही....

तिच्या ह्या प्रेम आवाहनाने 

मी हळुच तिला म्हटले

अगं हो पण आपले हे प्रेम !

किती घटकांचे राहाणार आहे ?

कारण तु देश सोडणार आहेस नां !

ती लाजत लाजत मला म्हणाली

अरे तु लिखाण करणारा

मग आपल्या अल्प काळ प्रेमावर 

तु काही तरी लिखाण करशील

ती आठवण हृदयात कोरुन ठेवील

चिरकाल तुला ना विसरण्यासाठी....

आणि हळुचं मी डोळे उघडले

बघतो तर काय ?

स्वप्नात आलेली ती कोरोना

फार दुर निघुन गेलेली होती

कायमची माझ्यापासुन !

ह्या आयुष्यातुन !!

मला कधी ना भेटण्याकरीता...!!!


-------------------------------------

नागपूर दिनांक २१/०३/२०२६

(कोराना काळात लिहिलेली माझी ही 

कविता अचानक दिसुन आली. पुनश्च 

सादर तुमच्या वाचनाकरीता)

No comments:

Post a Comment