Monday, 2 March 2026

 👌*बुद्ध साद तु झाली...!*

      *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न. ९३७०९८४१३८


ही रात्र ती गेल्यावर सकाळ तु आली

अंधार युग जाता बुध्द साद तु झाली...


पुणे पेशवाईची साथ आज ती आली

हया नेत्यांचे पाय चाटु साज तु झाली

हे कर्म सिद्धांताला फुटीरता ती आली

स्वाभिमानी अस्त्र इतिहास गाद झाली...


प्राचिन त्या भिंतीवर याद तुझी रे आली

सुखाच्या दिवसाची नाद विसरता झाली

प्रेमाच्या अंकुर गाठीत सैलता ती आली

सुवर्ण युगाची ती रात्र लई मोठी झाली...


ह्या फुलांच्या गंधाची मैत्री मनात आली

प्रज्ञा करुणा भावनेला सोबत ती झाली

आयुष्य जगण्याचे संगित ताल ही आली

अशांत जगाला शांती अहिंसा साद झाली...


---------------------------------------

नागपूर दिनांक ३ मार्च २०२६

(बुद्ध साहित्यातील प्रेम - मैत्री -

 सौंदर्यशास्त्र - निसर्ग - नैतिकवाद)

No comments:

Post a Comment