Saturday, 14 March 2026

 🎋*ही निसर्ग सुंदर कळी !*

     *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      मो.न. ९३७०९८४१३८


ही निसर्ग सुंदर कळी मनात तु भरली आहे 

बुध्द फुल होवुन विश्वा ह्या तु सावरीत आहे...


जीवाला जीव लावणारी साथ ही हवी आहे 

ह्या उदंडी वा-याला खुप दुर लोटायचे आहे 

तुफानी दिवांच्या प्रकाशाने उजळायचे आहे 

भीमाच्या संघर्षाचे प्रतिक आम्हा होणे आहे...


ह्या प्रेमाचे मधुर संगित तुला हे गायचे आहे 

तुझ्या रे तालीमध्ये करुणा रस हा हवा आहे 

हे प्रज्ञा भावनेतुन शील जीवन रे घडले आहे 

बुध्दाची तार छेडता अत्त दिप हे होणे आहे...


ह्या फुलांच्या गंधामध्ये खुप हे रमायचे आहे

पाखरं जीव उडाण आता आम्हा हे घेणे आहे 

गनिमी कावा खेळापासुन दुर हे जायचे आहे 

बुध्द प्रेम मैत्रीला ह्या विश्वात रे बहराचे आहे...


----------------------------------------

(बुद्ध साहित्यातील प्रेम - मैत्री - सौंदर्यशास्त्र)

नागपूर दिनांक १४ मार्च २०२६

No comments:

Post a Comment