🌪️ *नाही तर ह्या युध्दातुन....?*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७
मो. न. ९३७०९८४१३८
बुध्दाला त्रिवार वंदन हेचं जीवनाचे सार आहे
भीमाच्या संविधानाने तो अधिकार दिला आहे...
आग असो वा मशाल ही ज्वलन पेटणारी आहे
जल शांतीची बुंद करुणा हिचं बुध्द धारा आहे
प्रेम शब्दाला आग लावणारा ही माणुसचं आहे
प्रश्न इथे माणसाच्या उध्वस्त उगवतीचा आहे...
बंधुता - मित्रता भावनेचा प्रेम हा एक दुवा आहे
माणसाला माणुसकी देणारा तो बुध्द साद आहे
स्वातंत्र समतेचा नाद हे भारताचे संविधान आहे
भीम बाबांच्या विचारांची ती बुध्द क्रांतीचं आहे...
बुध्दाचा कार्यकारण भाव हे जगाचे सुत्र आहे
शुण्यवाद ह्या बुध्द विचारातुन जग प्रारंभ आहे
माणुस प्रेम हे जगातील सर्वोच्च बुद्ध सत्य आहे
नाही तर ह्या युध्दातुन जगाचे फक्त संहार आहे...
*****************************
नागपूर, दिनांक २७/०५/२०२४
https://youtu.be/cyE6TNxL2po?si=rpOVyV_nmJwl5Ijf
No comments:
Post a Comment