😞 *दगदगीच्या जीवनात...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
नासिक - मुंबई राजकिय शहरात
कारने समृद्धी मार्गाने जातांना
जीवनातील सुखद व्यवसाय प्रवास
निसर्गाचे सुंदर सान्निध्य असणे
रस्त्यातील हिरवी सुंदर वनराई
वाटा पळवाटा घाट भुयारी मार्गातुन जाणे
मध्येच पावसांच्या सरीने स्वागत
मनाला प्रेम शांती अनुभव देवुन जातो
वातावरणात प्रेयसीचा गंध असतो
कार ही पुढे पुढे जात असते
तिच्या प्रेमाच्या सुखद आनंदात....
मुंबईच्या दगदगीच्या जीवनात
दैनंदिन लोकल प्रवास
निरंतर सुरु दिसत असतो
तो कधी थांबत नाही
कुणाची वाट बघत नाही
वेळेचे असणारे महत्व
तो व्यवहार जपत असतो
म्हणुनचं तो चालत असतो
थांबला तर जीवनात संपला
हे त्याच्या जीवनाचे ब्रिद वाक्य...
पण त्या दगदगीच्या जीवनात
प्रेम नसते वा शांती ही नसते
आणि जीवनातील करुणा ही
मुंबई ही वेळेनुसार धावत असते
जर थकवा आला तर
ती सांगणार आहे तरी कुणाला ?
बाहेर पडायला उसंत नसल्याने
तो जीवन वेळ शोधत असतो
आणि मग सुट्टीचा सहारा घेतो
विपश्यना ही त्याची गरज होते...
बुध्दाच्या मिशन प्रवासात
जीवनाचा सुखद आनंद असतो
सत्य असते - प्रेम असते
मैत्री असते - शांती असते
आणि करुणा ही असते
नाटकीय भाव कधीच नसतो
दगाबाजी नसते वा खोटेपणा नसतो
दगदगीचे असणारे जीवन नसते
निसर्गाचे सान्निध्य असते
हाताला हात देणारा साथ असतो
तो नाद फक्त बुध्द असतो...!!!
*************************
मुंबई, दिनांक १४ मे २०२४
No comments:
Post a Comment