Saturday, 30 June 2018

🌹 *बुध्द करुणा आली ...!*
              *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
                मो.न. ९३७०९८४१३८

तुझ्या आसवांनी, प्रेम जाग रे झाली
दु:खीता सेवेची, बुध्द करुणा आली ...

तुझ्या संग फिरता, लई मजा आली
इथे माणसी रक्ताची, ही होळी झाली
दीनांचे रक्त पितांना, ना शरम आली
प्रेम भाव रुजण्या, गरज ती झाली ...

निसर्ग भावाची, उधळ फार झाली
ह्या फुल गुणाची, सुगंध साद आली
जीव संगिताची, तार बेभान झाली
शुध्द भाव हवेची, जगा कमी आली ...

ह्या भीम श्रमाशी रे, बेईमानी झाली
लांडग्याच्या संगे, कुत्र्याची जात आली
संविधान जपण्या, भीम साद वाली
ह्या जन चेतनेची, क्रांती वेळ आली ...

* * * * * * * * * * * * * * * * * * *
       (भारत राष्ट्रवाद समर्थक)

No comments:

Post a Comment