🌹 *बुध्दास वाहतांना ....!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
ती फुले मी वेचतांना, बुध्दास वाहतांना
श्रध्दावान झालो, प्रज्ञा भाव जोपासतांना ...
दिगंतातील बुध्द किर्ती, मी ती पहातांना
निरुत्तर झालो, इथे माणसे कटतांना
जातीभाव वणवेची, आग ही पेटतांना
फुले भीमाचा जन्म व्हावा, हा साद होतांना ...
स्त्री अब्रुचा इथे, महा बाजार मांडतांना
ढोंगशाही कहर, सत्तेने जोपासतांना
कोण आहे रे वाली, विश्वासी तडा जातांना
ह्या शील नीतिचा, शुध्द भाव हा शोधतांना ...
अंशात ह्या जगाला, करुणा स्पर्श देतांना
ह्या सुंगधात दिसला, बुध्दवाणी गातांना
युध्द की बुध्द, ह्या भ्रम वादात झोकतांना
जगा नाद झाले, बुध्दाला शरण जातांना ...
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
ती फुले मी वेचतांना, बुध्दास वाहतांना
श्रध्दावान झालो, प्रज्ञा भाव जोपासतांना ...
दिगंतातील बुध्द किर्ती, मी ती पहातांना
निरुत्तर झालो, इथे माणसे कटतांना
जातीभाव वणवेची, आग ही पेटतांना
फुले भीमाचा जन्म व्हावा, हा साद होतांना ...
स्त्री अब्रुचा इथे, महा बाजार मांडतांना
ढोंगशाही कहर, सत्तेने जोपासतांना
कोण आहे रे वाली, विश्वासी तडा जातांना
ह्या शील नीतिचा, शुध्द भाव हा शोधतांना ...
अंशात ह्या जगाला, करुणा स्पर्श देतांना
ह्या सुंगधात दिसला, बुध्दवाणी गातांना
युध्द की बुध्द, ह्या भ्रम वादात झोकतांना
जगा नाद झाले, बुध्दाला शरण जातांना ...
No comments:
Post a Comment