Tuesday, 16 April 2024


 🌹 *ह्या निसर्गाच्या सुंदर वनात !*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न. ९३७०९८४१३८


आयुष्याच्या मशाली 

ह्या नेहमी पेटतचं असतात

पण थंड करणारा ओलावा

ही माणसाची गरज आहे 

कारण नित्याची पेटणारी आग

हा भविष्याचा भुकंप असतो

आणि कधी तर तो भुकंप उद्रेक 

सर्व काही उध्वस्त करुन जातो...

बुध्दाचा कार्यकारण भाव

हे चिरकाल जग सत्य आहे 

तथागत म्हणतात

इदं सति इंदं होति

इदं असति इदं न होति

अर्थात कारण असेल तर 

कार्य ही घडत जाते

जर कारण नसेल तर

कार्य कधीच होत नाही...

बुध्दाने ह्या सृष्टीमध्ये 

तिन अस्तित्व नाकारले आहेत

सृष्टी ही अजर अमर सचेतन अचेतन‌ नाही.

संस्कार नाश पावणारे आहेत

जगात परमार्थ जीव वा आत्मा नाही 

मग भुमी विस्तारवाद युध्द

माणसांचा असणारा स्वार्थ

असत्य बोल असो वा फसवेगीरी

नित्याचा चालणारा हा आलाप

कां ??? हा अहं प्रश्न आहे...

फुलपाखरु असो वा पक्षी जीव

ह्या अ-बोल जीवांची प्रेम नाती

वृक्ष वल्लींची सुंदर मोहक हिरवळ

विविध फुलांच्या रंग बिरंगी छटा 

दरवळणा-या फुलांचा सुंगंध

निसर्गाची ही खास किमया

मी रोज अनुभुती करतो आहे

ह्या निसर्गाच्या सुंदर वनात ...!!!


**********************

नागपूर, दिनांक १५ एप्रिल २०२४

 https://youtu.be/QSWpyMawDCw?si=MVrDFMtognUCrJr3

No comments:

Post a Comment