🦅 *माणसांची गरुड झेप ...?*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
माणसांची गरुड झेप
हा फक्त शब्द जाल आहे
गरुडाची असणारी उंच भरारी
पंखांच्या शक्तीमध्ये दडलेली असते
तरी पण गरुडाची मन इच्छाशक्ती
ही तेवढीच प्रबळ दिसुन येते
एवढेच काय तर
पायांच्या त्या तिक्ष्ण नखांनी
आणि वाकलेल्या त्या चोचीद्वारे
शिकार करण्याची किमया केली जाते
परकीय आश्रय हा कधीचं नसतो...
जेव्हा गरुड शक्तिहिन म्हातारा होतो
तेव्हा समोर दोन पर्याय असतात
एक मृत्यु तर दुसरी जगण्याची उम्मीद
गरुड हा दुसरा मार्ग स्वीकारतो
उंच पहाडावर तो बसेरा करतो
दगडावर चोच आणि नखांना आपटुन
चोच - नखांना तो तोडुन टाकतो
तसेच चोचीने पंखांना उपटीत असतो
ह्या असह्य तिव्र रक्तबंबाळ वेदनांना
गरुड मुकपणे सहन करीत असतो
सहा महिणे तो वेदनामय जीवन जगतो
नंतर गरुड नविन जोश घेवुन येतो
गरुडाचा नवा जन्म झालेला असतो...
गरुडाची तुटलेली चोच नखे पंख
पुन्हा ती नव्याने जन्म घेत असतात
मादी गरुडाच्या अंड्यातुन
निघणारे बाल गरुड पक्षी सुध्दा
तरुण अवस्थेत आल्यावर
उंच झाडावरील आपल्या घरट्यात
स्व पंखांना उडण्याचे बळ देत असतो
आणि आपल्या नविन जीवनाला
बाळ गरुड सुरुवात करीत असतो
कुणावर तो निर्भर राहातं नाही
गरुडाचा हा स्वाभिमान - इच्छाशक्ती
माणसामध्ये मी शोधत असतो...
माणसांचा शार्टकट
लवकर श्रीमंतीची असणारी आस
फसवेगिरी वा धोका करणारी वृत्ती
खोटे बोलण्याचे ग्लोबल्स तंत्र
दुस-यांकडे हात पसरणारा भाव
थुक चाट आसन असो वा
शय्या सोबतीचा सहज मार्ग
स्वाभिमानाला गहाण ठेवणे सुध्दा
माणसानी स्विकारलेले परलंबीत्व
माणसाचे कुणाच्या ओझ्याखाली दबणे
हा एक शोध प्रश्न झालेला आहे
परिस्थितीला सामोरा न जाता
मनुष्यत्व भावनेचा बळी देवुन
नविन मित्रांचे संग म्हणावे वा
दुस-या नविन सावजाच्या शोध ही आहे...
फिनिक्स हा सुंदर रंगाचा पक्षी
आयु मर्यादा ५०० ते १००० वर्षे
असे सांगितले जात असते
फिनिक्स स्व: अंताच्या समयी
आपल्या घरट्याला आग लावुन
स्वतःला त्या आगीमध्ये झोकुन देतो
सरते शेवटी उरते ती फक्त राख
फिनिक्स त्या राखेतुन जन्म घेत असतो
अशी ही आख्यायिका आहे
मग अंड्यातुन पक्षी जन्म नाही काय ?
हा एक संशोधनाचा प्रश्न आहे
बुध्द कार्यकारणभाव सांगताना
माणसाला सचेत करुन जातात
इदं सति इदं होति
इदं असति इदं न होति
अर्थात कारण असेल तर
कार्य ही घडत जात असते
जर कारण नसेल तर
कार्य कधीचं घडुन येत नाही
आणि हे बुध्द वचन
चिरकाल जग सत्य आहे
निसर्ग चक्र हे सु़ध्दा सत्य आहे
प्रश्न हा माणुस धर्माच्या
अविवेकवाद - असत्यवादाचा आहे...!!!
*************************
नागपूर, दिनांक २३ एप्रिल २०२४
No comments:
Post a Comment