🌎 *जागतिक (?) आंबेडकरी साहित्य महामंडळाचा ४ - ७ फेब्रुवारी २०२४ रोजी बँकाक (थायलंड) येथे होणा-या आंबेडकरी साहित्यिकांच्या उपक्षितेत डा श्रीपाल सबनिस नाच्याचा खडा डॉंस ?*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
मो. न. ९३७०९८४१३८ / ९२२५२२६९२२
आंबेडकरी (?) साहित्य महामंडळ (?) हा उद्देश सामोरा ठेवुन, संस्थेचे नामकरण करतांना *"जागतिक"* आणि *"महामंडळ"* हे महा नाव जोडुन महामंडळाचे महान (?) अध्यक्ष *प्रा. दीपक खोब्रागडे* ह्यांनी मागिल काही वर्षात, काही हौशी - गौसी मंडळींना सोबत घेवुन, सदर संस्थेच्या वतीने जो उपदव्याप चालविलेला आहे, आणि सोबतचं *"जागतिक आंबेडकरी साहित्य महामंडळाचा आठवा वर्धापन दिन"* हा २७ मार्च २०२२ रोजी, दीक्षाभूमी नागपुरच्या *"दीक्षाभूमी ऑडिटोरियम"* मध्ये कसा बसा घेण्यात आला. थायलंड (बँकाक) विदेश वारीच्या लालीपॉप दाखवुन *तथाकथित ब्राम्हण दलित (?) - डॉ. श्रीपाल सबनिस* ह्याला सदर अध्यक्षपद देण्यात आले. तसा श्रीपाल सबनिस हा फारचं अफलातुन माणुस आहे. मराठी साहित्य सम्मेलनात माजी अध्यक्ष / ईहवादी साहित्यिक *डाॅ. श्रीपाल सबनिस* ह्यांनी एप्रिल २०२२ मध्ये नागपुरात झालेल्या **पहिल्या माय मराठी सम्मेलनात"* दलित साहित्यचं नाही तर, आंबेडकरी साहित्याच्या आपल्या वेगळेपणाला विरोध केला होता. आणि *दिपक खोब्रागडे* नावाचा भाट त्या माणसाला आंबेडकरी साहित्य सम्मेलनाला बोलावित आहे. *"एकीकडे आंबेडकरी साहित्याचा विरोध तर दुसरीकडे त्या नावाच्या परिषदेचे अध्यक्षपद...?"* ही आहे श्रीपाद सबनिसांची बेशरमगिरी...! मध्यंतरी मलेशिया देशातील आंबेडकरी परिषद *"पैश्याच्या अफरातफरीत"* विवाद हा *दीपक खोब्रागडे - सुजीत मुरमाडे* ह्या साल्या भाटव्यात झाल्याची चर्चा जोरात सुरु आहे. तसे बघता *"जर कुणी चांगला उद्देश ठेवुन सामाजिक / सांस्कृतिक कार्यक्रम घेत असल्यास, सदर कार्यक्रम घेण्यास विरोध असता कामा नये."* पण सदर कार्यक्रम घेण्यास चांगला उद्देश न ठेवता, जर व्यावसायिक उद्देश असेल तर ह्या संदर्भात सखोल चिंतन होणे हे फार गरजेचे आहे.
आता हा *प्रा. दिपक खोब्रागडे* कोण आहे ? आणि आंबेडकरी साहित्य क्षेत्रात तो कधी आला ? त्यानी ह्या साहित्यात काय नविन अविष्कार केले ? हे सुध्दा समजुन घेणे फार आवश्यक आहे. *सुजित मुरमाडे* नावाच्या मुलाचा तो *"जिजाजी / बहिण जावई"* आहे. आणि हा *सुजित मुरमाडे* मुलगा अमेरिकेतील आमचे मित्र "आंबेडकर मिशन" चे *स्मृतिशेष - राजु कांबळे* ह्यांचा एक प्रकारचा "सांगकाम्या" होता. राजु कांबळे हा जेव्हा ही नागपुरला *"आंतरराष्ट्रिय बौध्द परिषद"* घेत असे, तेव्हा सुजितला आंतरराष्ट्रिय स्तरावरील मान्यवरांना पत्रव्यवहार करणे, आवश्यक असणारी कामे करणे, पैशाचा हिशोब ठेवणे, अशी कामे देत असे. अचानक *राजु कांबळे* ह्यांनी जगाचा निरोप घेतला. आणि सुजित मुरमाडेचे व्यापारी डोके मग कामाला लागले. कारण सुजित ह्याने एक *"प्रकाशन संस्था"* उघडुन, पुस्तक प्रकाशनाचे काम तेव्हा हातात घेतले होते. माझ्याकडे ही तो कामाच्या निमित्ताने बरेचदा आलेला होता. आणि आंबेडकरी समाजाची दिशाभुल करण्याकरीता, त्याचे जीजाजी *प्रा. दीपक खोब्रागडे* ह्यांना पुढे करुन, साहित्य नावाने अलग संस्था बनवितांना *"जागतिक"* आणि *"महामंडळ"* असे मायाजाळ करणा-या नावाचा प्रयोग सुरु केला. आणि ह्यामध्ये काही हौशी - गौशी मंडळी गळाला लावुन, सदर नावाने ह्यांनी व्यापारीकरण सुरु केले आहे. आणि *"आंबेडकरी समाजाची"* ह्या प्रकारे दिशाभुल सुरु झाली.
*दिपक खोब्रागडे / सुजित मुरमाडे* ह्या जोडीने *"जागतिक आंबेडकरी साहित्य परिषद"* घेण्याकरीता अ-आंबेडकरी / महा - जातियवादी *गिरिश गांधी* नावाच्या बनिया सोबत घट्ट दोस्ती केली आहे. गिरिश गांधी ह्याला सोबत घेतल्या शिवाय ह्या उपद्रवींचा कार्यक्रम कधी होतचं नाही. ह्या *गिरिश गांधी* नावाच्या राजकिय नेत्याने आपल्या *"बौध्द मुलीने"* त्याच्या भावासोबत संसार थाटलेला असतांना, त्या आपल्या बौध्द मुलीला *"साले धेडी, हमारे घर में घुशी क्या ? तिला धक्के मारुन / शिविगाळ करुन घराच्या बाहेर काढणारा असा महानायक (?)"* आणि अशा महानायका सोबत *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* ह्यांनाही सोबतीला घेवुन *"जागतिक आंबेडकरी साहित्य सम्मेलन"* घेण्याचा असफल प्रयत्न चालविलेला होता. त्या विरोधात मी (डॉ. मिलिन्द जीवने) लिहिलेल्या लेखामुळे सदर *"जागतिक आंबेडकरी साहित्य परिषद"* ही उधळल्या गेली होती. दु:ख असे की, *"संविधान साहित्य"* नावाने अलग असे दुकान उघडणारे माजी सनदी अधिकारी *ई. झेड. खोब्रागडे* ही, जातीयवादी *गिरिश गांधी* सोबत आंबेडकरी नावाने उपदव्याप करीत होते. आंबेडकरी साहित्यिक म्हणवुन घेण्यास नकार देणारा साहित्यिक - आमचा मित्र *लोकनाथ यशवंत* असो की, सरस्वती पुरस्कार स्विकारण्यास धन्यता मानणारा साहित्यिक *शरणकुमार लिंबाळे* असो, ह्या सर्व मंडळीचा मार्ग हा *गिरिश गांधी* ह्याच्या दारातुनच जात असतो. ह्याला आम्ही काय म्हणावे ? *काय आंबेडकरी चेतना मेलेली आहे ?*
आता आपण चर्चा करु या *"आंबेडकरी साहित्य"* संदर्भातील...! सदर *"जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाची"* आंबेडकरी साहित्यातील विशेष असणारी उपलब्धी ती काय आहे ? सदर जागतिक आंबेडकरी साहित्य महामंडळाने, *"समस्त डॉ. आंबेडकर साहित्याचे कालानुरुप लिखाण"* संशोधन करुन प्रसिध्द केले आहे काय ? कारण बाबासाहेब समजण्याकरीता बाबासाहेबांचे कालानुरुप लिखाण समजणे, हे फार गरजेचे आहे. सदर महामंडळाने *"आंबेडकरी साहित्य आणि चळवळीची दिशा - दशा संदर्भाने मुल्यमापन"* केले आहे काय ? ह्या महामंडळाने *"आंबेडकरी साहित्याचे खरे सौंदर्यशास्त्र"* आंबेडकरी समाजापर्यंत पोहचविले आहे काय ? सदर महामंडळाने *"ह्या आंबेडकरी सिध्दांताची संशोधन मांडणी"* नव्याने केलेली आहे काय ? *"जागतिक शोषितांचे साहित्य आणि आंबेडकरी साहित्याचे"* मुल्यमापन केले आहे काय ? कारण सदर संस्थेच्या नावात *"जागतिक"* आणि *"महामंडळ"* असे मायाजाळ शब्द आहेत. तेव्हा त्यांची ही जबाबदारी ठरणार नाही काय ? अजुन बरेच काही विषय आहेत. त्यावर नंतर चर्चा करु या. प्रश्न असा की, दीपक खोब्रागडे समुहात *"दुय्यम कार्यरत लोकांचे"* आंबेडकरी साहित्यातील योगदान काय आहे ? फक्त अशा कार्यक्रमात नाचायला भेटते म्हणुन *"नाचणा-या नाचांच्या"* वैचारिक भावांचा विचार होणे, हे गरजेचे आहे. *डॉ. एन. सिंह* असो की, माजी केंद्रिय आयुक्त *डॉ. के. पी. वासनिक* असो, की अन्य कुणी मान्यवर असो, आंबेडकरी चळवळ ही *"तळागळाला"* जात असतांना, आमची ही मानसिकता समाजाला कोणती दिशा देणार आहे ? हा मुख्य प्रश्न आहे. आणि अश्या आंबेडकरी द्रोही आणि फसव्या विचारांच्या मान्यवरा (?) कडुन *"विभिन्न पुरस्कार स्विकारणा-या आणि सहभाग घेणा-या"* तमाम मान्यवरांचे आपण तर अभिनंदनचं करायला हवे...! आणि *"थायलंड"* देशात होणा-या आणि सहभाग घेण्या-या तमाम पदाधिकारी वर्गाचे ही छान अभिनंदन...! आणि महत्वाचे म्हणजे सदर कार्यक्रमात *"नामांकित आंबेडकरी साहित्यिकांची"* उपस्थिती काय असणार आहे ? कारण उपस्थित असणारे बहुतेक *"प्रमुख पाहुणे"* ही राजकारणी / धर्मकारणी / प्राध्यापक क्षेत्रातील आहेत. तेव्हा अशा *"जागतिक (?) आंबेडकरी साहित्य महामंडळाच्या"* कार्यक्रमापासुन दुर राहावे किंवा नाही, हा विषय मी तुमच्यावर सोडतो. जय भीम ...!!!
* * * * * * * * * * * * * * * * *
(नागपूर, दिनांक ०३ जानेवारी २०२३)
No comments:
Post a Comment