😷 *ह्या मुक्या वेदनांना...!*
*डॉ. मिलिन्द जीवने ''शाक्य'* नागपूर
मो. न. ९३७०९८४१३८
ह्या मुक्या वेदनांना बाबा तुम्हीचं जागे केले
तुमच्या दु:ख वेदनांचे हे कोण वाली झाले...
दु:ख ह्या सागरात माझे हात ही डुबता झाले
सर्वस्व पण माझे ह्या जगात उध्वस्त झाले
सागर तो किनारा ना ही मला शोधता आले
बाबा तुमचा विचार हिच माझी शक्ती झाले...
उगवे ही पहाट मला सुर्य ना शोधता आले
चंद्राच्या आडोशीचे ना किरण बघता आले
शीतल चांदण्याचे ना मधुर गीत गाता आले
रात्र काळोखी हे काजवा दीप सोबत आले...
बाबा तुमच्या जाण्याने हे सर्व पोरके झाले
ह्या सत्ता नीतिने सारे नेतेचं आंधळे झाले
माणसांचे खरे चेहरे हे नित्य बदलता झाले
कोण माझा कोण पराया ना शोधता आले...
* * * * * * * * * * * * * * * * *
नागपूर, दिनांक ११ डिसेंबर २०२३
(आजच्या आंबेडकरी समाजाची स्थिती)
No comments:
Post a Comment