Thursday, 9 June 2022

 🎼 *ह्या भीम संगिताची...!"*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        मो. न.‌ ९३७०९८४१३८


ह्या भीम संगिताची गोडी वाढवा

हे बुध्द विचाराचा जागर जागवा...


काळ्या मातीचा हिरवा गारवा

ह्या‌ जाती रुढीचा वणवा पेटवा

वर्षा धारेतुन ही कणसे पिकवा

हा भुक विकाराचा दामन पिटवा...


बैलाचा श्रमातील आसुड सोडवा

माणसी बैलाचा हा विकार बुजवा

हे टोकी तुतारीचा घायाळी मारवा

संविधानाचा हक्क हा नाद मिरवा..


गावाच्या शिवारातील प्रेम आठवा

हे हृदयी कुलपाचा बंधक मिटवा

प्रेमाच्या वाटेवर हा फुलारा पिकवा

उद्याच्या संसाराची ही गोडी जागवा...

No comments:

Post a Comment