.🎒 *जीवनातील ओझ्यांचा प्रवास...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर
मो. न. ९३७०९८४१३८
ह्या जीवचर जीव जंतु वृक्ष पौध्यांनी
पृथ्वीवर जन्म घेणे
हे चिरकाल सत्य आहे
आणि जीवनातील ओझ्यांचा प्रवास
हा चिरकाल चालु असणारा
एक नित्याचा प्रवाह आहे....
निसर्ग जंगलातील प्रवास आनंद असो
वा नदी सागर किनारा सोबत असो
वा इतिहास प्राचीर भींतीवर बसुन
मनाच्या जुडणा-या आठवणी असो
कळत नकळत विस्मरुन जात असतात
कधी कधी तर त्या कायमच्याच
ह्या हृदयात साठवल्या जात असतात....
निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या
ह्या सृष्टी जीवाचे रुप न्याहारतांना
बुध्दाचे जीवन भ्रमण
बहुजन हिताय बहुजन सुखाय
हा मंत्र जनसाद घेत असतांना
प्रेम मैत्री बंधुता करुणेला
मन कप्यात चेतवत असतांना
हळुवार वा-याची झुळख
ही माणसाला आनंद देवुन जाते....
निसर्गाच्या रंगी बिरंगी फुल सानिध्यात
माणुस रममाण होत असतांना
फुल आणि पाखरांचे निस्सिम प्रेम बघतांना
कधी कधी तर हेवा करुन जातो
पण माणसांचे हे काही वेगळेचं असते
तो हे निसर्ग अनुभव घेत असतांना
जगण्याची कविता करुन जातो
एक जीवन सत्य म्हणून !!!!!
* * * * * * * * * * * * * * * * * *
नागपूर, दिनांक २५ फेब्रुवारी २०२४
No comments:
Post a Comment