Wednesday, 7 February 2024

 ✍️ *अमळनेर येथील ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ते १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनातील वैचारिक संघर्ष आणि बुध्द - आंबेडकरी साहित्यातील दुरत्व !*

    *डॉ. मिलिंद जीवने 'शाक्य'* नागपूर ४४००१७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु (म.प्र.)


      अमळनेर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष *डॉ .रविंद्र शोभणे* आणि ह्या सोबतचं १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष *डॉ .वासुदेव मुलाटे* ह्या दोन परस्पर विरोधी अध्यक्षांची प्रेम गळाभेट विषय, हा तसा फार चर्चेचा विषय होवुन गेला. वर्धा येथे झालेल्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष *न्या. नरेंद्र चपळगावकर* आणि विद्रोही संमेलनाचे अध्यक्ष *डॉ.चंद्रकांत वानखेडे* ह्यांच्या झालेल्या गळा प्रेम भेटीची आठवण करुन दिली. माजी अध्यक्ष *न्या. नरेंद्र चपळगावकर* ह्यांनी मात्र ह्या मराठी साहित्य संमेलनाला दांडी मारुन, साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याची परंपरा ही मोडीत काढली. तसे बघता ह्या *"दोन्हीही साहित्य संमेलनाची"* प्रासंगिकता, विषय केंद बिंदु हे उत्तर दक्षिण ह्या दिशांचा बोध करणारी अशी आहेत. *"अभिजन विरुध्द बहुजन"* हे म्हणावे किंवा *"प्रस्थापित विरुध्द विद्रोही"* असे ह्या साहित्य संमेलनाचे स्वरूप आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला *"सरकारीकरणाचा बागुलबुवा"* फार दिसुन येतो. अर्थात मराठी साहित्य स़मेलन व्यासपीठावर *"राजकिय सत्ता नेते"* ही नाचतांना विशेषतः दिसुन येतात. हां विषय अलग आहे की, *"ती नाचा नेते हे व्यासपीठावर साडी आणि हातात बांगड्या घालुन बसलेली नसतात."*  साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांचे औचित्य काय आहे? हे मात्र समजायला काही मार्ग नाही. ह्या विषयावर माझा लिहिण्याचा मागिल दोन तिन दिवसांपासून खुप  विचार होता. परंतु माझ्या फार व्यस्ततेमुळे, मला ह्या विषयावर लिहिणेचं शक्य झालेले नाही. आणि अश्यातच माझा मोबाईल हा चोरीला गेला. आणि मला लिहिण्यास पुर्णतः लकवत्व आले. असो, आता मुळ विषयाला हात घातलेला आहे.

     अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष *डॉ रविंद्र शोभणे* ह्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा उहापोह करु या. शोभणेंच्या भाषणात *"देशीवादाचा विरोध"* हा मुख्य विषय बघता, नविन चिंतन विषय दिसुन आलेला नाही. आणि बाकी सारे हे नेहमीचे विषय होते. डॉ शोभणे हे *"देशीवादाचा"* उहापोह करतांना *"प्रांतवाद, जातवाद"* ह्या विषयावर मत प्रदर्शन करतांना ते विसरले नाहीत.‌ परंतु *"धर्मांधवाद, देववाद"* ह्या विषयाला मात्र त्यांनी दांडी मारली. दुसरे असे की *"तिन कोटींच्या वर खर्च"* होणा-या मराठी साहित्य संमेलनाला प्रेक्षकांची ही दांडी असल्यास त्याला काय म्हणावे ??? विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष *डॉ. वासुदेव मुलाटे* ह्यांनी भारतीय सत्ता व्यवस्था संदर्भात बोलतांना *"बेभरवसा, अविश्वसनीयता, असुरक्षितता"* ह्या विषयाला स्पर्श केला आहे. तसेच साखळीने जखडलेल्या लेखणीला मुक्त करणे, लेखणीची धार जोपासुन *"अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होणारी मुस्कटदाबी"* ह्यावर हल्ला चढविला. मावळते संमेलनाध्यक्ष *चंद्रकांत वानखेडे* ह्यांनी प्रस्थापित समाज व्यवस्थेसह ब्राह्मणवादावर कठोर हल्ला चढवला. बाकी सारे विषय हे नेहमीचेचं म्हणावे. *"विद्रोही साहित्य ह्याचे खरे मुळ, तत्कालीन औचित्य आणि त्यानंतर आलेले परिवर्तन"* हा विषय आयोजकांना समजला आहे काय ? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

     .*"साहित्य भाषेचा उगम आणि भाषा लिपी"* ह्या संदर्भात प्राचिन‌ काळामध्ये जाणे हे गरजेचे आहे. प्राचिन भारताची *"सिंध संस्कृती"* संदर्भात बोलायचे झाल्यास, विदेशी ब्राह्मणांचे *"प्राचिन भारतावर आक्रमण"* समजुन घ्यावे लागणार आहे. त्यानंतर येणा-या *"वैदिक काळात"* लिपीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. ब्राह्मणी *"वर्णव्यवस्था युग""* आणि अमानवतावाद युगाचा असणारा तो केंद्र बिंदु. इसा पुर्व दुस-या - तिस-या शतकाच्या *"बुध्द कालखंडात"* आपल्याला भाषा साहित्याची / लिपीची अनुभुती होते.‌ *"संस्कृत ही भाषा पाली - प्राकृत भाषा नंतरची उपज आहे."* अर्थात संस्कृत ही सर्व भाषांची जननी नाही, ह्या सत्याचा बोध होवुन जातो. इंडो - ग्रीक राजा *मिनांडर प्रथम* (मिलिंद राजे):आणि *बौध्द भंते नागसेन* ह्यांच्या विवादाचे लेखन *"मिलिंद पन्ह"*  (मिलिंद प्रश्न) ह्याचा कालावधी इसा पुर्व १०० चा एक इतिहास आहे. बुध्दाची शिकवण *"नेतीगंधा वा नेत्तीपकरण"* ह्या मार्गदर्शन पुस्तकाचा कालखंड ही तोच दिसुन येतो. *बुध्द घोष* द्वारा रचित *"त्रिपिटक"* ह्या बौध्द धर्मग्रंथांचा कालखंड इसा पुर्व पाचवे शतक आहे. बुध्दाच्या जीवनावरील *"निदानकथा"* ह्या ग्रंथांचा कालावधी इसा पुर्व पहले शतक आहे. बुध्दाच्या जीवनावरील *"दीपवंश"* (चवथे - पाचवे शतक) तसेच *"महावंश"* (पाचवे शतक) ह्या साहित्य रचनेचा इतिहास आहे. ह्या सोबत बौध्द भंते *"अश्वघोष"* (कालखंड इसा पुर्व ८० - १५०) ह्यांची रचना *"बुध्द चरित्र / सौदरानंद / सुत्रालंकार / सारीपुत्र सुची / वज्र सुची"* प्रसिद्ध आहेत. प्राचिन भारताचा पहिला नाटककार / संगितकार म्हणुन अश्वघोष हे परिचीत आहेत. *कालिदास* हा ब-याच नंतर जन्माला आलेला ब्राह्मण पंडित.

     *भंते अश्वघोष* ह्याच्याशिवाय प्राचिन बौध्द साहित्यामध्ये - *भंते नागार्जुन* ( मध्यमिक सिध्दांत / मध्यमिक सुत्रालंकार‌ / सद्धर्म पुंडरीक / सुभलेखा / रसरत्नाकर ), *अमरसिम्हा* (अमरकोष / संस्कृतचा पहिला शब्दकोष), *वासुनाबढु* (अभिधर्मकोष / बौध्द दर्शनाचा पहिला शब्दकोष), *बुध्द घोष* (विशुध्दीमग्ग / सुमंगलवासिनी / अट्ठकथयेन), *दिगनागा* (तर्काचा सिध्दांत / प्रमाणमुचाय परिचय), *धर्म किर्ती* (न्यायबिंदु) ह्या प्राचिन बौध्द कालीन साहित्याला आपण विसरणार आहोत काय ? हां महत्वाचा प्रश्न आहे. ही प्राचिन पुस्तके व्याकरण आधारीत बौध्द साहित्य पुंजी आहे. *बौध्द सौंदर्य शास्त्र, नैतिक वाद, निसर्गवाद, मानवतावाद ह्यांची अनुभुती देणारे साहित्य आहे.* त्यानंतर जन्माला आलेला ब्राह्मण पंडित *कालिदास* हा ऋतुसंहार / कुमारसंभवम् / रघुवंशम् / मेघदूत अशी काव्यरचना करतो. आणि महाकवी होवुन जातो. *कालिदास हा भोगवादाकडे घेवुन जातो.* साहित्यिक संशोधक मंडळी ह्या सम्यक दिशेने जातांना दिसत नाही, ह्याला आम्ही काय म्हणावे ? कालिदास हा *रामायण, महाभारत, पुराणावर* आधारीत नाटके, कविता ह्याला तो पुरस्कृत करतो. आणि आम्ही लोक फक्त *"विद्रोही साहित्य"* घेवुन उदो उदो करतो. प्रश्न‌ हा आहे की, *'केवल विद्रोह करून चालणार आहे काय ?"* आम्ही आमचे *"सौंदर्य शास्त्र, निसर्ग शास्त्र, मानवता शास्त्र, नैतिक शास्त्र"* ह्याची जोपासणा करणार आहोत की नाही ? त्यानंतर इसवी सन १८ व्या शतकात *महात्मा ज्योतिबा फुले* हे विद्रोही विचाराने आम्हाला चेतवितात. आणि १९ व्या शतकात *डॉ. बाबासाहेब आंबेडकर / छत्रपती शाहु महाराज* आम्हाला आमच्या हक्काची जाणिव करुन देतात. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी तर बुध्दाचे बोट धरुन *"स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय"* आधारीत विचारांकडे चालण्याचा मंत्र देतात. आम्ही ती दिशा न पकडता केवल विद्रोही विचारात अडकत असणार काय ? हां प्रश्न आपण सर्व भारत देश प्रेमींकरीता ...!!!


* * * * * * * * * * * * * * * * * * *

नागपूर, दिनांक ७ फेब्रुवारी २०२४

No comments:

Post a Comment