🌹 *पारिसाच्या स्पर्शातुन...?*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
पारिसाच्या स्पर्शातून
लोखंडाचे सोने होते
बोलले जाणारे हे शब्द
आमच्या ऐकण्यात होते
परंतु प्रत्यक्ष तसा साक्षात्कार
आम्ही कधी बघितलाचं नाही
आणि माणसाची गरिबी
ही आजही दुर झालीचं नाही...
पण माणसाच्या स्पर्शातुन
माणुस हा विटाळला जातो
बुरसटलेल्या धारेतुन
अन्यायाची जिवंत गाथा
इथे रचल्या जात होती
माणसाच्या माणुसकीचे
धिंडवडे आम्ही बघत होतो
उध्वस्त राख हातात घेत होतो...
सिध्दार्थाचा जन्म झाला
बुध्द म्हणुन उदयास आला
प्रेम मैत्री बंधुभाव करुणेचा
जंबुद्वीपात नाद झाला
स्वर्णमय प्राचिन भारताचा
इतिहास आम्ही बघतो होतो
प्रेम मैत्रीचे मधुर नाती
अंधारात आम्ही शोधत होतो...
* * * * * * * * * * * * * * *
नागपूर, दिनांक ७/१०/२०२३
No comments:
Post a Comment