Thursday, 19 October 2023

 🌍 *निसर्गाची सौंदर्यता...!*

      *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो.न. ९३७०९८४१३८


निसर्गांची सौंदर्यता

रस्त्ताच्या दोन्ही बाजुला

असणारी ती हिरवळ झाडे

शुध्द मनमोहक हवेची झुळक

नागमोडी रस्त्यातील वळण

आणि कारने असणारा प्रवास

माणसाला आनंद देणारा

चिरकाल आठवणीचा ठेवा

जपुन ठेवतांना

मनातील कविता बाहेर येत असते

ती बोलत असल्याचा भास होतो

आम्हाला विसरायचे नाही बरे कां !

आणि विश्वाच्या एका प्रदेशात

मी रममान होवुन जातो...

प्राचिन बौध्द विद्यापीठ

आणि बुध्द विहाराच्या जाड भिंती

ह्यांच्यासोबतचे असणारे सानिध्य

प्राचिन भारत इतिहासात

घेवुन जात असतांना 

ती माझ्यासोबत बोलत आहे

मनाला सुखद अनुभुतीची

एक साक्ष असावी

असा चिरकाल बोध होतो

आणि शब्दांच्या गुंतागुंतीला

कवितेच्या रूपामध्ये

जन्माला घातलेले असतांना

प्रसवाच्या कठिण वेदना

ह्या कधी झाल्याच नाहीत...

जगाच्या प्राचिन इतिहासाला

आणि ह्या निसर्ग सौंदर्यतेला

माझ्या मनातील प्रेम

म्हणुन बघतांना

माझ्या प्रत्यक्ष समोर आल्याचे

चित्र रंगवीत असतांना

मी चित्रकार बनुन जातो

आणि मनाच्या कुंचल्याने

रंगविलेल्या ह्या चित्रामध्ये 

स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करतो

तेव्हा मी शुन्य असतो

निसर्गाची सौंदर्य दृष्टी

आणि जगाचा प्राचिन इतिहास

हा फार मोठा आहे 

हे सत्य मी कळुन जातो...


* * * * * * * * * * * * * * 

नागपुरच्या परतीच्या प्रवासात...

दिनांक १९ आक्टोबर २०२३

No comments:

Post a Comment