✍️ *महाठग - नितिन गजभिये / फिल्मी हिरो - गगन मलिक ह्यांचा १० करोडचा नवा प्रस्ताव समाज कल्याण विभागात सादर वा मंजुर : एक गुपित*
* दीक्षाभूमी येथे *७ एप्रिल* रोजी *"मोफत बुध्द मुर्ती रजीस्ट्रेशन"* करणे ही जाहिरात फसवी वा कशी वा जमघटा करीता ?
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
मो. न. ९३७०९८४१३८ / ९२२५२२६९२२
महाठग - नितिन गजभिये / फिल्मी हिरो - गगन मलिक ह्यांच्या *"अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय संस्था"* ह्या संस्थेच्या नावाने एकाच जागेवर *"मुद्रांक विभाग"* ह्यांची धुळफेक करुन *"बुध्दा इंटरनेशनल स्कुल"* च्या नावे रू. १४ लाख ९० हजार ह्या राशीची अवैध सुट घेतली. सदर शाळा त्या जागेवर कधी सुरु केलीचं नाही. आणि पुन्हा त्या एकाच जागेवर सामाजिक न्याय विभाग ह्यांच्याकडुन *"डॉ. आंबेडकर विपश्यना केंद्र"* हा प्रकल्प सुरू करण्याकरीता *"दोन करोड"* ही राशी घेवुन, महाराष्ट्र शासनाची फसवणुक केलेली आहे. सदर प्रकरण सध्या *पुणे मुख्यालय येथे अंतिम निर्णयास्तव प्रलंबीत* आहे. आता नव्याने माहिती पडले की, महाठग - नितिन गजभिये / फिल्मी हिरो - गगन मलिक ह्यांनी सामाजिक न्याय मंत्री - *धनंजय मुंडे* ह्यांच्या मार्फत, दुसरा नवा *"१० करोडच्या राशीचा रेसिडेंसीयल प्रस्ताव"* मंजुर करुन घेतल्याची उडती खबर आहे. अर्थात महाठग - नितिन गजभिये हा मंत्री / आमदार ह्यांची अती जवळीक करुन, फसवेगिरीचा हा गोरखधंदा बिनधास्तपणे चालवित आहे. सदर गोरखधंद्यात त्या दोघां व्यतिरीक्त आमचे धम्म मित्र *इंजी. पी. एस. खोब्रागडे* आणि अन्य सहभागी मंडळी ही सहभागी आहेत काय ? हा प्रश्न
महाठग - नितिन गजभिये हा आपल्या मित्राकडे बोलला की, सामाजिक न्याय मंत्री *धनंजय मुंडे* ह्यांच्या खाजगी सचिव मार्फत आर्थिक देवाण घेवाण करुन सदर संस्थेच्या नावाने *"रेसिडेंसीयल प्रस्ताव"* हा प्रस्ताव मंजुर झाल्याचे तो छान बोलुन गेला. सदर प्रस्तावा संदर्भाने लवकरचं संपुर्ण माहिती गोळा करण्यात येत आहे. *"अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय संस्था"* ह्या नावाने *"बुध्द मुर्तीच्या व्यापारीकरण"* संदर्भात बदनामी ही फार जास्त झालेली असल्यामुळे *"गगन मलिक फाऊंडेशन"* ह्या वेगळ्या नवीन नावाने *"बुध्द मुर्ती व्यापारीकरण"* आता होणार आहे काय ? असा नविन प्रश्न अनुत्तरीत आहे. कदाचित ह्या नव व्यापारात *"गगन मलिकची हिस्सेदारी"* ही जास्त राहाण्याची शक्यता आहे. आणि आमचे धम्म मित्र *इंजी. पी. एस. खोब्रागडे* आणि अन्य नव्याने जुडलेली अन्य मंडळी ह्यांचा असणारा वाटा ? पुन्हा प्रश्न आहे. महाठग - नितिन गजभिये ह्याच्या *"आधीच्या दोन करोडच्या"* प्रकरणात सामाजिक न्याय विभाग नागपुरचे प्रादेशिक उपायुक्त *डॉ. सिध्दार्थ गायकवाड* ह्यांनी सदर प्रकरण दाबल्याचा प्रयत्न केल्यामुळे, ते संदिग्ध आरोपी असुन पुन्हा हे *"१० करोडचे (?) प्रकरण"* खरे असल्यास पुढचे काही खरे नाही ? कारण आता सदर प्रकरण संदर्भात राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख सचिव / राज्य संचालक पुणे / प्रादेशिक उपायुक्त नागपुर / अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय संस्था ह्यांना *"कायदेशीर नोटीस"* ही पाठविण्याबाबत विचार सुरु आहे. तसेच सदर प्रकरण नंतर *मा. उच्च न्यायालयात दाखल* केले जाणार आहे.
महाठग - नितिन गजभिये / फिल्मी हिरो - गगन मलिक ह्यांनी आजपर्यंत *आणलेल्या बुध्द मुर्ती संदर्भात* शासनाकडुन माहिती गोळा करुन, मग सदर विकलेल्या मुर्तीचे मुल्यमापन केले जाणार असुन, नंतर सदर विषया संदर्भात फसवेगिरीची नवीन केस करण्यात येणार आहे. *"शिवली बोधी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि."* संदर्भात ही मध्य प्रदेश / चंद्रपूर / गडचिरोली / गोंदिया / भंडारा / काटोल / कन्हान / नागपुर ह्या विभागातील ग्राहक ही एकत्र येत असुन, सदर सामुहिक तक्रारीचा आकडा हा *"५० - ६० करोड रुपये"* पार करण्याची शक्यता आहे. पुढे ह्या प्रकरणात सहभागी मान्यवर लोकांच्या अडचणी फार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि *"गगन मलिक फाऊंडेशन"* च्या नविन नावाने *"दीक्षाभूमी येथे ७ एप्रिल २०२२"* रोजी घेण्यात येत असलेल्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष आहे. एक नविन आवाहन म्हणुन...! जय भीम.
* * * * * * * * * * * * * * * * * *
No comments:
Post a Comment