Monday, 17 May 2021

Nitin Gajbhiye cheated Public by crores og Rupees.

 👺 *महाठग चिटर - नितिन गजभिये टीमकडून धम्माच्या नावाने शासनाची लाखोंची धोकादारी ह्या शिवाय लोकांंना भुखंड विकुन रजीस्ट्रीकरीता फिरविणारा नटवरलाल...!!!* (भाग - २)

    *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

   राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

    मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


       महाठग चिटर *नितिन गजभिये* ह्याची स्वत:च्या नावे वा त्याची कंपनी *"शिवली बोधी इंफ्रास्ट्रक्चर प्रा.‌ लि."* किंवा त्याच्या संबधित लोकांची असलेली *"अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय शिक्षण संस्था"* असो, ह्यांचे नावे कुठलीही मालकी हक्क असलेली सदर जमिन नसतांना ही, *"मुद्रांक विभाग (ग्रामिण), नागपूर"* ह्या विभागाने *"बुध्दा रेसिडेंसीयल स्कुल"* च्या नावाने *"रु. १४, ९०,०००/- इतकी राशी माफ"* करुन फसविले जाणे आणि त्याच पिरियडमध्ये *"सामाजिक न्याय विभाग,"* महाराष्ट्र शासन ह्यांच्याकडून *"डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना ध्यान केंद्र"* नावाने *"दोन करोड रुपये"* लाटने, आणि हे सर्व प्रकरण होत असतांना, तत्कालिन शासन अधिका-यांनी योग्य तपासणी न करणे, खरचं हा तर एक संशोधनाचा विषय आहे.

    महाठग चिटर नितिन गजभिये चे सदर प्रकरण वाचल्यानंतर माझ्या एका मित्राने त्याला एक नाव दिले आहे - *"नटवरलाल - नितिन गजभिये...!"* आणि ह्या ४० वर्ष वयाच्या महाठग / चिटर / नटवरलाल - नितिनचा फ्राडगिरीचा इतिहास ही फारचं रंजक आहे. ‌ *"अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय शिक्षण संस्था"* ही २८ डिसेंबर २००५ ला स्थापन केली. ह्यानंतर २१ मे २०१० ला *"सलोनी फुड्स प्रा. ‌लिमिटेड,"* दिनांक ६ जुलै २०११ ला *"विदर्भ रिसोर्ट एंड व्हेंचर्स प्रा. लिमिटेड,"* दिनांक १३ सप्टेंबर २०१२ ला *"क्लब व्हिलेज इंफ्रा एंड रिसोर्ट इंडिया प्रा. लिमिटेड,"* दिनांक २९ आगस्ट २०१३ ला *"शिवली बोधी इन्फ्रास्टक्चर प्रा.‌ लिमिटेड,"* आणि ह्या सोबतचं अलिकडे नटवरलाल नितिनने - पंजाब नॅशनल बैंकेच्या वर, *सन्याल नगर, नारी रोड ह्या त्याच्या कार्यालयात*, काही महिला वर्गाला सोबत घेवुन *"बुध्दीस्ट महिला निधी लिमिटेड"* ही स्थापन केलेली आहे. सदर महिला निधी लिमिटेड बद्दलचा इतिहास ही फारच रंजक आहे. त्यावर नंतर कधी तरी आपण चर्चा करु. महाठग नितिन गजभिये ने स्थापित केलेल्या त्या *"चार प्रायव्हेट लिमिटेड"* चा कालखंड ही अगदी लागुन लागुन आहे. महत्वाचे म्हणजे सदर चार कंपन्या पैकी *"फेक कंपनी कोणती?"* हा संशोधनाचा विषय आहे.

    "मे. शिवली बोधी इन्फ्रास्टक्चर प्रा.‌ लि."  ह्या कंपनीचे ठगवाज चिटर / नटवरलाल *नितिन गजभिये* (०२९६५९५८) ह्याच्या सोबत असणारी अन्य तिन डायरेक्टर - *अल्केश प्रकाश गजभिये* (०६७६६०२०) / *अशोक दादुजी खोब्रागडे*(०६७७०८२१) / *राध्येश्याम गंगाप्रसाद शाहु* (०६७०४०२७) ही आहेत. सदर कंपनीचा *पंजीकरण क्र. U45400MH2013PTC247642* हा असुन रजिस्टर्ड कार्यालय पत्ता ०८, विश्वास अपार्टमेंट्स, एच.बी. टाऊन, नागपूर - ८ असा आहे. सध्या कंपनी व्यवहार हा पंजाब नॅशनल बैंकेच्या वर, सन्याल नगर, नारी रोड, नागपूर द्वारे होत असुन, *"कंपनी बिझनेस एक्टिविटी - कंस्ट्रक्शन"* अर्थात सदर क्षेत्र हे केवळ Builder ह्या सदरात मोडणारे आहे. सदर *"कंपनीचे कार्यक्षेत्र - Developer"* हे नसल्यामुळे, त्या कंपनीला सिहोरा येथिल सदर *"जागेचा विकास करने / प्लाट पाडने / प्लाट विकणे"* असा हा अधिकारच नाही. अर्थात नटवरलाल - नितिन गजभिये ह्यांनी सिहोरा जागेच्या १५ मालकांची ही फसगत केलेली आहे. ‌ *आणि ज्या लोकांनी तेथिल प्लाट विकत घेतले आहेत, त्या लोकांचीही फसगत केलेली आहे...!*

     नटवरलाल - नितिन गजभिये ह्याने मौजा - सिहोरा तालुका - पारसिवनी जिल्हा - नागपूर *भुखंड क्र. ११३* आराजी ३.१२ हेक्टर पैकी २.३० हेक्टर जमिनीचे रजीस्ट्री  करतांना - *"अवैधरित्या मुद्रांक शुल्क माफी"* ही घेतलेली आहे. सदर मुद्रांक माफी अवैध असल्यामुळें, मुद्रांक जिलाधिकारी नागपूर (ग्रामिण) ह्यांनी "अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे" सर्वच्या सर्व पदाधिकारी / शिवली बोधी प्रा.‌लि. चे नितिन गजभिये / आणि तत्कालिन मुद्रांक जिलाधिकारी ह्यांचे विरोधात *"फौजदारी गुन्हा दाखल करणे / माफी केलेली रू.‌१४,९०,०००/-"* ही राशी वसुल करण्याचा अहवाल नागपूर विभागीय कार्यालय / पुणे मुख्यालयाला (विभाग - ४) पाठविला आहे. सदर मुद्रांक विभागाचे वरीष्ठ अधिकारी ह्या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करतील. परंतु सदर *"जमिनीचे बकाया क्षेत्र - ०.८२ हेक्टर"* ह्या जागेवर पाडण्यात आलेले प्लाट हे लोकांना विकले गेले आहेत. तसेच *"अन्य जमिन प.ह.ल.‌ १५ आणि खसरा क्र. १६४, १६५, १६६/१ ह्या जागेवर"* ही प्लाट पाडुन, सदर प्लाट *"रू.‌१७५/- चौरस फुट* ह्या दराने विकण्यात आलेले आहेत.‌ सदर प्लाट लोकांनी *"पांच लाख ते सात लाख रूपये"* किंमतीने विकत घेतलेले असुन, सदर लोकांना केवळ प्लाटची नोटरी करुन देण्यात आलेली आहे. ‌ *सदर प्लाटची रजीस्ट्री लोकांना करून देण्यात आलेली नाही...!* ह्या संदर्भात ब-याच लोकांचे नटवरलाल नितिनच्या कार्यालयाचे उंबरठे झिजले. शेवटी काही लोकांनी सदर प्लाटची रक्कम परत मागितली.‌ *परंतु नटवरलाल नितिनने त्या लोकांना दिलेला चेक कधी वटलाचं नाही...!*

       मध्यंतरी महाठग चिटर / नटवरलाल *नितिन गजभिये* ह्याच्या फ्राडपणावर मी मिडियावर लिहिलेले असल्यामुळें, ब-याच लोकांनी माझ्याशी संपर्क केलेला आहे. ‌तेव्हा पुनश्च संबधित सर्व लोकांना ह्याद्वारे कळविण्यात येते की, *आपण तहसिल आॅफिस पारसिवनी कार्यालयातुन सदर जागेचा ७/१२ काढुन,* तुमच्यावर अन्याय झालेला असल्यास तसेच नितिन गजभिये ह्यांनी दिलेला चेक न वटल्यास,  संबधित *पोलिस स्टेशनला फौजदारी तक्रार* दाखल करावी. किंवा *वकिलाचा सल्ला घ्यावा.* निश्चिंतचं महाठग नटवरलाल नितिन गजभिये ह्याने *"कर्रोडो रुपयाचा अपहार* केलेला केलेला आहे. त्याचे हे अय्यास / लक्झरी जीवन, आपल्याला सर्व काही सांगुन जाते. हर दोन - तिन वर्षात नविन कार विकत घेणे, आणि आता नितिनने नव्याने *"एम.जी. कंपनीची घेतलेली पंचवीस लाखाची कार"*, ही ती साक्ष आहे. तुम्ही लोकांच्या पैश्यावर कुणी महाठग ऐष आराम उपभोगित असल्यास, तुम्हाला आता तुमच्या हक्काचे गुंतविलेले सर्व पैसे, परत मिळण्याकरिता तुम्हालाचं आता बाहेर पडावे लागणार आहे...!!!





* * * * * * * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment