🤡 *महाठग चिटर - नितिन गजभियेचा नटवरलाल विदेश सफरनामा..!*(भाग ३)
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपुर १७
राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
"दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिये.
ये लडकी पटती है, पटाने वाला चाहिये.
टोपी दी जाती है, पहनाने वाला चाहिये.
जादु की छडी है, ये चलाने वाला चाहिये."
महाठग चिटर - नितिन गजभिये उर्फ 'नटवरलाल' ह्याचे हे बोल नेहमी असायचे. *"बस, ये जादु की छडी घुमा दुं, पैसों की बारिस होगी. एक मंतर दिया तो, लडकी भी हाजीर होगी..!"* तसे बघितले तर हा ४० वर्षाचा नटवरलाल - नितिन गजभिये, कधी काळी भंडारा रोडवरील *"एका पेट्रोल पंपावर, लोकांच्या गाड्यांमध्ये पेट्राल भरणारा गडी."* आज पंचवीस लाखाच्या एमजी लक्सरी कारमध्ये मस्त फिरतो आहे. हर दोन तिन वर्षात कार बदलत राहाणे, हा त्याचा विशेष शौक. आणि मित्रांमध्ये अशी ही चर्चा आहे की, नितिन म्हणायचा, *"तो (नितिन) कुछ दिन के बाद, पचास करोड का मालिक बनेगा..!"* आज तो अय्यास / आलिशान / मौजी असे जीवन जगतो आहे. विदेश वा-या ही करतो आहे. हे सर्व काही त्याला इतके सहजतेने मिळालेले नाही...! त्याच्या *"जादूच्या छडीची...(?)"* हिच ती कमाल आहे...!!!
नितिन उर्फ 'नटवरलाल' ह्याने *"मुद्रांक विभाग नागपूर (ग्रामिण)"* ह्या विभागाला रु. १४,९०,०००/- ह्या राशीची टोपी दिली असो की, *"सामाजिक न्याय विभाग"* मुंबई ह्यांच्याकडुन *"दोन करोड रुपये"* ही राशी अवैधपणे उचलने असो, सदर राशीच्या माध्यमातुन तसेच सिहोरा ह्या खेडेगावांमध्ये *"बुध्दा स्पिरिचुअल पार्क"* बनविण्याचे लोकांना स्वप्न दाखवुन, कवडी मोल किंमत असलेल्या / स्व: मालकी नसलेल्या जागेवर बरेच *"प्लाट पाडुन करोडो रूपये"* उकळने असो, किंवा *"विदेशातुन मोफत वितरण करण्यास आलेल्या बुध्दाच्या मुर्त्या बौध्द विहाराला विकणे"* असो, हे काही साधे सुधे काम नाही. नितिन गजभिये ह्याचा हा कलंदर इतिहास वाचुन, माझ्या एका मित्राने त्याला *"नटवरलाल "* हे नाव दिलेले होते. आता त्या मित्राने, तो लोकांना सुंदरसे स्वप्न दाखवित असल्यामुळें, अजुन त्याला एक अलग गोंडस नाव दिले आहे - *"सपनों का सौदागर...!"*
महाठग - नितिन हा पोरकट असतांना, नागपुरातील एका टीव्ही चैनलच्या मित्राला घेवुन माझ्याकडे दोन तिनदा येवुन गेला. आणि त्याने सिहोरा येथे उभारावयाच्या *"बुध्दा पार्क"* विषयी माझ्याशी तो बोलत असतांना, मी त्याला काही दाद दिली नाही. नंतर *चंद्रबोधी पाटील / शंकरराव ढेंगरे* ह्यांच्या माध्यमातुन सन २०१५ ला, नितिन गजभिये द्वारा श्रीलंका येथुन *"बुध्द अस्थि धातु"* नागपुरला आणण्याचे आयोजन करण्यत आले. तेव्हा मी *"आंतरराष्ट्रिय बौध्द परिषद / जागतिक बौध्द महिला परिषद २०१५"* घेण्याचे प्लनिंग केले होते. आणि आमच्या होणा-या मिटिंगमध्ये मी हा विषय ठेवुन, पुढे माझ्या आॅफिसमध्ये चार पाच महिला संघटनेच्या साप्ताहिक सभेचे नियमित आयोजन करीत असे. *"तेव्हा नितिनच्या कु-नीतीचा रिपोर्ट माझ्याकडे आलेला होता. मग ही गोष्ट मी चंद्रबोधी पाटील ह्यांच्या कानावर टाकली. आणि नितिनला जास्त महत्व देण्याबाबत मी उत्सुक नव्हतो."* परंतु नितिन गजभिये ह्याने चंद्रबोधी पाटील ह्यांना आपले गुरू मानले असल्यामुळें आणि नितिनच्या गोड बोलण्यामुळे पुढे चंद्रबोधी पाटील ह्यांचीही फसगत होवुन गेली. मी तर सदर कार्यक्रम संपल्यावर, त्याच्याशी सर्व संबधचं तोडुन टाकले. *परंतु नितिनने चंद्रबोधी पाटील ह्यांच्याकडुन, विदेशातील मान्यवरांचा जो परिचय करावयाचा होता, तो करुन घेतला.* जेव्हा नितीनचे खरे रूप चंद्रबोधी पाटील ह्यांना कळले होते, तेव्हा बराच वेळ झालेला होता. ह्यासोबतचं श्रीलंकन सिने निर्माते *नविन गुणरत्ने* ह्यांनी काढलेल्या *"भगवान बुध्द"* ह्या मुव्हीमध्ये तथागत बुध्दाची भुमीका करणारा अभिनेता *'गगन मलिक"* हा ही नितिनच्या गोडबोले शब्दात पुर्णपणे आलेला होता.
नटवरलाल नितिनकडे पैशाची खदान आल्यामुळें मग काय, सिने अभिनेता *गगन मलिक* ह्याच्या माध्यमातुन विदेशी मान्यवर लोकांशी मित्रता करण्याचा मार्ग हा खुला झाला. दिनांक २१ आक्टोबर २०१५ च्या आमच्या कार्यक्रमाला श्रीलंकेचे राष्ट्रपती *मैत्रीपाला सिरिसेना* ह्यांनी आम्ही दिलेले निमंत्रण स्विकारून, श्रीलंका सरकारने त्यांचा भारतात येण्याचा कार्यक्रम पाठविला होता. त्यांना माझ्या *"जीवक वेलफेयर सोसायटी"* तर्फे *"प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रिय पुरस्कार "* देवुन सन्मानित करण्यात ही येणार होते. परंतु भारत सरकारच्या गृहमंत्रालयाचे तत्कालिन मंत्री राजनाथसिंग ह्यांनी, *"दीक्षाभूमीवर होणा-या धम्म चक्र प्रवर्तन दिन"* ह्या कार्यक्रमातील गर्दीमुळे, शासन पोलिस सरंक्षण देण्यास असमर्थता दर्शविली. आणि श्रीलंका राष्ट्रपती ह्यांचा नागपूर भेटीचा हा कार्यक्रम रद्द झाला. परंतु थायलंड देशाच्या राजघराण्यातील राजकुमारी *H.R.E. Ms. Mom Luang Rajadarbari Jayankura* आणि विदेशातुन अन्य बरीच मान्यवर आमच्या कार्यक्रमाला आलेली होती. आमच्याकडे नागपूरची जबाबदारी आणि नितिन गजभिये ह्याच्याकडे विदेशी पाहुण्यांची जबाबदारी होती. त्या संधीचा त्याने चांगलाच फायदा उचलुन घेतलेला होता. *"विदेशी विमानतळांवर नितिनला मिळालेली व्हीआयपी ची वागणुक,"* आणि त्याला तिथे घेवुन जायला संबधित राजघराण्यातील / सरकारकडुन कार येणे, राजवाड्यामध्ये / सेव्हन स्टार होटलमध्ये राहाण्याची सुसज्ज व्यवस्था, आणि हे सर्व बघितल्यावर नितिन हा आकाशात उडायला लागलेला होता. पुढे मग नितिन गजभियेचे थायलंड मुख्यालय असलेल्या *World Alliance of Buddhist* - WAB ह्या आंतरराष्ट्रिय संघटनचे नागपूर प्रादेशिक "केंद्र प्रमुख" बनने, *UNPKFC Mun Model United Nation* चे "Faculty Adviser" बनने, तसेच WAB कडुन *"Golden Dhammadut Award / Global Buddhism Ambassador Award"* हे सर्व काही त्याने "जादुच्या छडीने" मिळवुन घेतले. श्रीलंका / बांगला देश / थायलंड / म्यानमार ह्या देशातील कार्यक्रमात तो धम्माच्या नावावर फिरून ही आला.
एके दिवशी महाठग - नितिन गजभिये ह्याचा मला अचानक फोन होता की, *"सर, मी तुमच्या संघटनेची WAB मध्ये नोंदणी करू काय ? तुमचे नाव पुरस्काराकरीता पाठवु काय..?"* तेव्हा मी नितिनला म्हटले होते की, *"नितिन, तु जेव्हा धम्म क्षेत्रात जन्माला ही आलेला नव्हतास, तेव्हा पासुन मी विदेशी मान्यवर लोकांशी / आंतरराष्ट्रिय संघटनेशी परिचीत आहे. मला जर पद हवे असते तर, संबधित बौध्द आंतरराष्ट्रिय संघटनच्या उपाध्यक्ष पदावर तरी मी नियुक्त झालो असतो. तुझी इतकी हैसियत नाही की, तु माझ्या नावाची शिफारस करशील...!"* त्या दिवशी अचानक माझ्याशी फारच जवळीक असलेले *शंकरराव ढेंगरे जी* हे माझ्याकडे आलेले होते. त्यांना नितिनचे बोलणे मी सांगितले. तेव्हा शंकरराव ढेंगरे जी मला म्हणाले की, "छान उत्तर दिले." हिच गोष्ट *चंद्रबोधी पाटील* ह्यांच्या संदर्भातही लागु आहे. ते विदेशात ह्यापुर्वी जाऊन आलेले आहेत. आणि हा नितिन आपल्या गुरूच्या (चंद्रबोधी पाटील) विदेश शिफारसीची फुशारकी मारतो आहे. मित्रांनो, नितिनच्या ह्या फ्राडगिरीने तो आता भारतात काय तर, विदेशात ही उजळ माथ्याने फिरणार नाही. *नितिनने त्याच्या व्यवसायात काय घाण केली,* त्याचाशी आमचा संबध नाही. परंतु धम्माच्या पवित्र ठिकाणी त्याने केलेली घाण, ही मात्र सहन केली जाणार नाही. भविष्यात आमचे मित्र सिने अभिनेता *गगन मलिक* ह्याला ही आता ह्या संदर्भात विचार करावा लागणार आहे...!!!
* * * * * * * * * * * * * * * * * *
No comments:
Post a Comment