👺 *महाठग चिटर - नितिन गजभिये टीमकडून धम्माच्या नावाने शासनासोबत लाखोंची धोकादारी (?): फौजदारी गुन्हा दाखल होणाची शक्यता...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७
राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
दिनांक २० - २१ आक्टोंबर २०१५ ला *"धम्म चक्र प्रवर्तन दिन"* निमित्ताने, *"दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ़ इंडिया एवं अश्वघोष बुध्दीस्ट फाऊंडेशन"* ह्यांच्या संयुक्त विद्यमाने, आणि *माझ्या* मार्गदर्शनात *"जागतिक बौध्द परिषद / जागतिक बौध्द महिला परिषद २०१५"* चे आयोजन *नागपुर* नगरीत करण्यात आले होते. तसेच १४ आक्टोंबर २०१५ ते २४ आक्टोंबर २०१५ पर्यंत *"श्रीलंका"* ह्या बौध्द देशातुन आणल्या गेलेल्या *"तथागत बुध्द ह्यांच्या अस्थिधातु"* समस्त आंबेडकरी जनतेला अभिवादन करण्यासाठी बेझनबाग मैदानात ठेवण्यांत आलेल्या होत्या. सदर कार्यक्रमाचे सफल आयोजन व्हावे म्हणुन नागपुरातील तमाम महिला संघटना, ह्यांच्या सभा ह्या *"माझ्या आॅफिस"* मध्ये होत असत. सदर ती सभा संपल्यावर *मी (डॉ. मिलिन्द जीवने) / चंद्रबोधी पाटील / शंकरराव ढेंगरे* आणि काही मंडळी बसुन, आमच्या *"आखणी चर्चा* ह्या होत असत. त्यावेळी चंद्रबोधी पाटील ह्यांना *नितिन गजभिये* हा मुलगा, *"आपल्या सोबत धम्म कामाच्या लायकीचा नसल्याचे"* हे मी बोलुन गेलो. तसेच श्रीलंका येथिल फिल्म प्रोडुसर द्वारा निर्मित *"Lord Buddha"* ह्या मुव्हीमध्ये *बुध्द* ह्यांची भुमिका करणारे अभिनेता *गगन मलिक* ह्याला ही, नितिन गजभिये ह्याच्या समोर म्हटले होते की, *"गगन, तुम्हे नितिन से बहुत संभलकर रहना है. वह बहुत ही धोकेबाज है...!"* महत्वाचे म्हणजे माझ्या बोललेल्या त्या शब्दांची सत्यता, चंद्रबोधी पाटील ह्यांना पुढे मात्र होवुन गेली. आणि नितिन गजभिये ह्याला *"विदेशी मान्यवर आणि काही अन्य नामांकित मान्यवर"* मंडळींना भेटवुन दिल्याची ती चुक, ही पुढे फारच धोकादायक ठरल्याचे आता चंद्रबोधी पाटील ह्यांना दिसुन येत आहे. पण ती वेळ आता निघुन गेलेली आहे.
मध्यंतरी विदेशातुन आलेल्या *"मोठ्या बुध्दमुर्ती"* (स्टॅंड - अडिच फुट / मुर्ती - साडे तिन फुट / एकुण ६ फुट उंच बुध्द मुर्ती) ह्या *महाठग - नितिन गजभिये* ह्यांच्या संबधित असलेली संस्था (मात्र नितिन गजभिये तिथे कोणी ही पदाधिकारी नाही) *"अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय शिक्षण संस्था"* तसेच त्याचा प्लाटचा व्यवसाय करणारी *"मेसर्स शिवली बोधी इन्फ्रास्टक्चर प्रा. लिमिटेड"* ह्या कंपनीच्या *"बुध्दा स्पिरिचुअल पार्क,"* सिहोरा - कन्हान ता. पारसिवनी जि. नागपूर येथे, नागपूर परिसरातील बुध्द विहारांना *"मोफत वितरण"* करण्यास पाठविण्यात आलेल्या होत्या. परंतु *महाठग / चिटर - नितिन गजभिये "* ह्यांनी त्या बुध्द मुर्त्या, अक्षरश: *"एक लाख - दोन लाख रूपये"* पार्टींकडुन नगदी घेवुन विकलेल्या होत्या. महत्वाचा विषय असा की, ज्या चंद्रबोधी पाटील ह्यांच्यामुळे त्याची ओळख झाली, त्यांच्या संबधित भोपाल येथिल बौध्द विहाराला ही, नितिन महाराज ने तेवढ्याचं रकमेची मागणी केली. *शेवटी चंद्रबोधी पाटील ह्यांना ही रू. ६०,०००/- महाठग - नितिन ह्याला देवुन ती बुध्द मुर्ती घेवुन जावे लागले.* जर नितिनला वर उचलणारे चंद्रबोधी पाटील ह्यांच्याशी, हा महाठग - नितिन असा व्यवहार करीत असेल, तर अन्य साधारण मंडळींसोबत त्याने काय व्यवहार केला असेल...? हा विचारचं न केलेला बरा...!!! इथे प्रश्न सिने अभिनेता *गगन मलिक* ह्याच्या मध्यस्थीचा ही आहे. सदर कोडे उकडण्यासाठी बुध्द मुर्तीचे पैसे दिलेल्या व्यक्तींनी महाठग - नितिन गजभिये ह्याच्या विरोधात पोलिसात तक्रार करुन, खरी पार्श्वभुमी समजुन घेणे गरजेचे आहे.
श्रीलंका ह्या बौध्द देशातुन *"बुध्दाच्या अस्थिधातु "* नागपुरात येणार असल्याने, सदर पवित्र अस्थिधातु करीता *"बुध्दरथ"* बनविण्याचा विषय असतांना, चंद्रबोधी पाटील ह्यांनी २५ -३० मंडळींच्या सभेत, *डॉ. मिलिंद जीवने साहेब बुध्द रथाचा खर्च स्पांसर करतील"* असे ते बोलुन गेले. तेव्हा अर्धा खर्च रु.५०,००० - ६०,०००/- मी देईल, असे आश्वासन दिले. आणि नितिन गजभिये च्या नावे *रु. ४०,०००/- चा चेक* दिला. बाकी लागलेला खर्च नंतर घेशील हे सांगितले. तसेच अन्य कामासाठी मी *चार लाख रूपये* दिले. परंतु नितिन गजभिये ह्यांनी सामाजिक न्याय विभागाकडुन *तिन लाख रूपये* खर्चाचा *" बुध्द रथ"* प्लनिंग / प्रस्ताव भारतीय बौध्द महासभा मार्फत पाठविला. वेळे अभावी सदर प्रस्ताव मंजुर झाला नसल्यामुळें, *शंकरराव ढेंगरे* ह्यांनी त्याला मिळालेली *रिटायरमेंट राशी रु. तिन लाख"* खर्च केली. ती राशी सुध्दा आयु. ढेंगरे ह्याला कधीचं परत मिळालेली नाही. महत्वाचे म्हणजे मी रथाकरीता दिलेलेे *रु. ४०,०००/- आणि अन्य चार लाख रूपये* महाठग - नितिन गजभिये ह्यांनी मला परत केले नाहीत. तसेच माझे मित्र *एड. संदेश भालेकर* ह्यांनाही त्याने *तिन लाखाचा* चुना लावलेला होता. आता ते नुकतेच ह्या जगातुन निघुन गेलेलें आहेत. त्यांनंतर *"अशोका टीवी चैनल "* नागपूर मधुन सुरु करण्याची खुरापत ठग - नितिन गजभियेनी काढुन, तो माझ्याकडे आला होता. तेव्हा मी त्याला स्पष्टचं सांगितले होते की, "मी दिलेले ते सर्व पैसे आधी परत कर. ह्यापुढे अशा कामाकरिता माझ्याकडे येवू नकोस." परंतु महाबोधी सोसायटी, श्रीलंका चे आंतरराष्ट्रिय अध्यक्ष *भंते बनागल उपातिस्स* ह्यांनी सदर *"अशोका टीव्ही चैनल"* करीता *"दिड लाख रुपये"* किंमतीचा तेव्हा कॅमेरा घेवुन दिलेला होता, त्याचे काय झाले...? हा अलग विषय म्हणावा लागेल...! अजुन महत्वाचा विषय म्हणजे, ज्या जागेवर नितिन गजभिये ह्यांनी *"बुध्दा स्पिरिचुअल पार्क"* हें उभे करण्याचे प्लनिंग केले होते, ती जमिन सुध्दा त्याच्या मालकीची नव्हती. ती जागा गावातील *पंधरा लोकांच्या* मालकीची होती. त्या जागेचा विकास करने / प्लाट पाडने आणि विकण्याकरीता *"पावर आफ अटर्नी "* ही नितिन गजभियेला दिलेली होती. परंतु त्या पंधरा गरिब शेतकऱ्यांचा महाठग - नितिन गजभिये ह्यांनी केलेला छळ, हा सुध्दा भयानक विषय आहे. आता नितिन गजभिये ह्याने शासनाला फसविल्याच्या विषयावर चर्चा करु यां...!
महाठग - नितिन गजभिये ह्यांनी सिहोरा गावातील सदर ठिकाणीं *रमेश गजभिये* ह्यांच्या सहीने, *"बुध्दीस्ट रेसिडेंसीयल स्कुल"* उघडण्याची महाराष्ट्र शासनाकडुन मंजुरी (?) घेतलेली होती. आणि पुढे त्यांच्यांत सहीने मुद्रांक जिल्हाधिकारी (ग्रामिण) नागपूर ह्या कार्यालयाकडे *"दिनांक १३/०६/२०१६ ला सदर जमिनीची रजिस्ट्री करण्याकरीता अर्ज* केलेला होता. त्यामध्ये महाराष्ट्र शासन आदेश पत्र क्र. एसटीपी/१३६४ दिनांक २९/१०/१९५४ अन्वये, सदर जमिनीचे बाजार भाव मुल्य *"रू. २ करोड एकोण नव्वद लाख दहा हजार"* हे असल्याने, त्यावर नियमानुसार रू. *"चवदा लाख नव्वद हजार पाचशे "* इतके मुद्रांक शुल्क देय असल्याने, सदर *"मुद्रांक शुल्क माफीची त्यांनी मागणी"* केली. सदर नितिन गजभिये ह्यांच्या मार्फत अर्जावर, दिनांक २४/०६/२०१६ ला *" मुद्रांक जिलाधिकारी (ग्रामिण) नागपूर* ह्यांनी रू. १४,९०,५००/- इतके मुद्रांक शुल्क माफ़ी दिली. महत्वाचे म्हणजे त्या तारखेला सदर जमिनीचे मालक १५ शेतकरी होती. आणि MOU वर फक्त सात शेतक-यांच्या सह्या होत्या. महत्वाचे म्हणजे त्या शेतक-यांनी सदर जमिन ही, *"अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय शिक्षण संस्था "* ह्यांना कधी दिलीचं नाही. तर जमिनीचा विकास करने, प्लाट पाडने आणि प्लाट विकणे ह्याकरीता *"मेसर्स शिवली बोधी इन्फ्रास्टक्चर प्रा. लिमिटेड"* चे डायरेक्टर *नितिन गजभिये* ह्याला "पावर आफ अटर्नी" अन्वये दिलेली होती. *"अर्थात नितिन गजभिये ह्यांनी, ही शासनाशी केलेली धोकादारी होती."* आणि अजुन पर्यंत कधी शाळा उभी झालीचं नाही.
महाठग - नितिन गजभिये ह्यांनी दिनांक १३/०६/२०१६ ला "बुध्दीस्ट रेसेडिंशीयल स्कुल" च्या नावाने, *"मुद्रांक शुल्क विभाग (ग्रामिण) नागपूर ह्या कार्यालया सोबत रू. १४,९०,५००/-"* ची धोकादारी केली. आणि दुसरीकडे सिहोरा येथिल त्याच जागेवर महाराष्ट्र शासनाच्या *सामाजिक न्याय विभाग* ह्यांचेकडे *"डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना ध्यान केंद्र"* हे उघडण्याचा प्रस्ताव टाकुन *मा. राजकुमार बडोले* सामाजिक न्याय एवं कल्याण मंत्री, महाराष्ट्र ह्यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १३/०७/२०१६ रोजी झालेल्या बैठकीत सदर प्रस्तावास *"दोन करोड रूपये "* मंजुर करवुन घेतले. त्यानंतर कार्यासन अधिकारी ह्यांचे पत्र *दिनांक १८ जानेवारी २०१७ रोजी* मा. आयुक्त, समाज कल्याण, पुणे आणि अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय शिक्षण संस्था ह्यांना *"सुधारीत प्रस्ताव"* पाठविण्यास सांगण्यात आले. *महत्वाचे म्हणजे दिनांक ११/०८/२०१७ पर्यंत अहिल्याबाई होळकर ह्यांचे नावे तिथे कोणतीही जमिन नव्हती....!"* ह्याशिवाय सदर शिक्षण संस्थेच्या उद्देशात *"विपश्यना ध्यान केंद्र"* सुरू करण्याचा कुठेही उल्लेख नाही. तेव्हा तत्कालिन मंत्री राजकुमार बडोले, ह्यांच्या आशिर्वादाने हा सर्व गोरखधंदा ठकबाज - नितिन गजभिये करीत होता, असे म्हणावे काय...??? हा प्रश्न आहे. कारण नितिन गजभिये ह्याने तत्कालिन मंत्री *राजकुमार बडोले* ह्यांना *श्रीलंका / थायलंड* ह्या देशाची सहल घडवुन आणलेली होती. *"अलिकडे तो काही मंत्री महोदय / मोठी राजकिय पक्ष नेते मान्यवर / आयोगाच्या काही सदस्य मंडळीसोबत अधिक जवळीक साधतांना दिसुन येतो आहे...!"* महत्वाचे म्हणजे नितिन गजभिये ह्याची ठकबाजी तत्कालिन मंत्री राजकुमार बडोले ह्यांच्या लक्षात आली. तेव्हा बरीच वेळ निघुन गेलेली होती. तरी पण राजकुमार बडोले ह्यांनी नंतर नितिन गजभिये ह्याला दुर सारले.
मुद्रांक शुल्क विभाग (ग्रामिण) नागपूर कार्यालयाचे मुद्रांक जिलाधिकारी एवं सह जिल्हा निबंधक वर्ग - १ ह्यांनी दिनांक ८/०३/२०२१ ला *"उपमहानिरीक्षक एवं मुद्रांक उपनियंत्रक, नागपूर विभाग / नोंदणी महानिरिक्षक एवं मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे"* ह्यांना आपला अहवाल पाठवुन, ह्या प्रकरणात दोषी असणारे - *"तत्कालिन मुद्रांक जिलाधिकारी / अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे तमाम सर्व पदाधिकारी / नितिन गजभिये "* ह्यांच्या विरोधात *" फौजदारी गुन्हा दाखल करणे / माफ केलेली मुद्रांक शुल्क वसुल करण्याबाबत"* पत्र पाठविले आहे. सदर कार्यालयाकडुन आदेश मिळताचं महाठग - नितिन गजभिये ह्याला केलेल्या महाठगीची शिक्षा होईलचं. महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री - *धनंजय मुंडे साहेब,* हे ह्या प्रकरणात जातीने लक्ष घालतील, ही अपेक्षा करु या. तसेच *"सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य"* ह्यांना सखोल कारवाई करण्याबाबत आदेश देतील, ही अपेक्षा आहे. कदाचीत सामाजिक न्याय विभाग, म. रा. पुणे हे *"अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत समस्त जागा आणि विपश्यना केंद्र आपल्या ताब्यात घेवुन,"* आपले शासकिय दायित्व पुर्ण करुन ह्या ठगपणाचा प्रतिबन्ध करतील...!!! आणि भविष्यात अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय शिक्षण संस्था ही *"शासनाच्या काळ्या यादीत"* जाण्याची शक्यता आहे.
मध्यंतरी *थायलंड* येथे मुख्यालय असलेल्या *"World Alliance of Buddhists - WAB"* ह्या बौध्दांच्या एका मोठ्या संस्थेला, कर्नाटक शाखेचे अध्यक्ष *भंते धम्मनाग* ह्यांनी, *"नितिन गजभिये ह्याच्या अनैतिक / धोकादारी कृत्याबाबत ३०० पानांचा* रिपोर्ट पाठवुन ह्याला नागपुर प्रमुख पदावरुन काढण्याची तक्रार केलेली होती. परंतु भारतातील *"कुण्या तरी एका अबौध्द शक्तीच्या आशिर्वादाने"* त्याला सदर पदावरून काढण्यात आलेले नाही. आता नितिन गजभिये ह्याने शासनाचीचं फसवणुक केली असल्यामुळें, आणि सदर *"अबौध्द व्यक्तीही"* ह्या प्रकरणात फसलेला असल्याने, *"आता नितिन गजभिये ह्याचे धम्मात केलेले घाणेरडेपण"* बाहेर येणार आहे. दुसरा मुद्दा असा की, *"नितिन गजभिये ह्यांनी लोकांकडुन जे लाखो रुपये घेतलेले आहेत, ते तो व्याजासह परत करणार काय...?"* कारण महाठग - नितिन गजभिये हा लोकांच्या ह्या पैश्यावरचं अय्यास / मनमौजी / आलिशान असे जीवन उपभोगित आलेला आहे. आणि शेवटी नितिन गजभिये ह्यांनी आता त्याच्या नारी रोड कार्यालयात *"बुध्दीस्ट महिला निधी लिमिटेड"* ही महिला आर्थिक संस्था स्थापन केलेली आहे. आता त्याने तिथे घाण करु नये. ह्या अपेक्षेतचं...!!!
* * * * * * * * * * * * * * * * * *
* ह्या महाठगपासुन लोकांनी वाचण्यासाठी, ही पोष्ट जास्त लोकांपर्यत शेअर करा...!!!
No comments:
Post a Comment