Friday, 18 October 2019

🌳 *बुध्दाच्या सावलीने.....!!!*
              *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपूर*
               मो. न. ९३७०९८४१३८

निल फुलांची वेल, बहरली दारावर
बुध्दाच्या सावलीने, स्मित करी जगावर...

ह्या निसर्गी सौंदर्यात, भोगिले सुख सारं
हिन माणुसी कळपाने, आला देव वार
इथे पेटुनी उठले, कुत्र्या भक्तीची धार
माणुसकी शोधतांना, अंत दिसे हा फार...

देशा अशोकाचे येणे, हे नियतीचे सारं
इथे धम्मचक्राने आले, जगी सुख फार
श्रृंगाच्या अवलादीने, केले ते बंट्याधार
स्वर्ण भारताचा, गुलाम इतिहासी वार...

भीमाच्या सादेतुन, आली संविधान धार
समानता मंत्राने, चेतला हा बहु भार
व्यक्तींच्या अधिकाराने, विकास झाला फार
तरी प्रतिक्रांतीचा वास, दिसे देशा हा मारं...

* * * * * * * * * * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment