🌹*प्रेमाचा मधु गोडवा !*
*डाँ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
हे साखर गोडव्याला
दिन गण दिन बघतांना
गोडवा कमी झालेला
आम्हाला दिसतो आहे
कदाचीत ह्या बदलाला
मिलावट ही म्हणु यां
प्रेमाचे अगदी तसेच आहे ....
ह्या मानवी प्रेमाला
प्रेमाच्या मधु गोडव्याला
कधी कधी फार उत येतो
तर कधी कधी
ह्या प्रेमाचा अंत ही होतो
ह्या मानवी जीवाच्या
प्रेम भावनेचे बघावे तर
काहीचं खरे नाही
कोण आपले कोण दुरवरचे
शोधणे फार कठीण आहे
तरी ही मानव जीव हा
प्रेमाचा खुप आसुसलेला
प्रेमाचा खुप भुखेला आहे ....
तसे बघावे तर प्रेमाचे
खुप काही प्रकार आहेत
आई - वडिलाचे प्रेम
पती - पत्नीचे प्रेम
प्रियकर - प्रेयसीचे प्रेम
भाऊ - बहिणीचे प्रेम
शेजार धर्म प्रेम
नाटकीय स्वरुप प्रेम
इत्यादी इत्यादी प्रेम संदर्भ
आपल्याला देता येईल ....
तरी ही निर्मल प्रेमामध्ये
दुरावा हा कां बरे होतो ?
विश्वास अभाव - स्वार्थ
मन - बुध्दी मतमतांतरे
ही प्रश्न नित्याची झालेली आहेत
प्रेम हा व्यापार नाही
प्रेम म्हणजे वासना नाही
प्रेमामध्ये द्वेषाला जागा नाही
प्रेम निर्मल भाव आहे
निर्मल प्रेम सत्य बोध आहे
प्रेमामध्ये करुणा आहे
अंतरंग मनाची साद आहे
सृष्टीचा सुंदर नाद आहे
प्रेम निसर्ग सुंदर देणं आहे ....
तथागत बुध्द
निसर्ग नाती सांगतांना
मानवता भाव बोलुन गेले
चार महाभुत - प्रतित्यसमुत्पाद
पंचशील - अष्टांग मार्ग
दहा पारमिता - चार आर्यसत्य
शुण्यवाद बुध्द धर्माची देणं आहे
प्रेम - मैत्री - अहिंसा
प्रज्ञा - शील - करुणा
स्वातंत्र - समता - बंधुता - न्याय
प्रजातंत्र हा मंत्र दिला
आता आम्हाला जंबुद्विपात
प्रेमाचा मधु गोडवा
मना - मनात रूजवायलाचं हवा....
--------------------------------------
नागपूर दिनांक ३० आक्टोबर २०२६
No comments:
Post a Comment