🌹 *बुध्द वाणीचा नाद !*
*डाँ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
गोडवा साखरेचा शेष नाही तुझ्यात हे
बुध्द वाणीचा नाद नाही तो तुझ्यात रे....
फुलाची कोमलता शोधु या मनात हे
प्रेमाचा मधुर गंध नाही तो तुझ्यात रे
शब्दांचा जागर सुटला ह्या जगात हे
सांजेची शीतल छाया ना ती तुझ्यात रे....
भुंग्याचा गंध नाद फिरे ह्या फुलात हे
फुलांचे निस्सिम प्रेम दिसे निसर्गात रे
आसुसले नयन शोधी कवेची छाया हे
जीवनाचा सार दडला ह्या आसवात रे....
बुध्द मैत्रीचा पथ हा सा-या जगी हे
करुणा नाद फिरे ह्या मना मनात रे
सुर्य किरण छाया ती चंद्राचा ग्रहण हे
बुध्दाचे धम्म चक्र फिरे ह्या जगात रे....
--------------------------------------
नागपूर दिनांक १४ सप्टेंबर २०२६
No comments:
Post a Comment