🌹 *बौध्द साहित्यातील प्रेम संदर्भाने साहित्य जगताला एक नविन दिशा दिली ...!*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.
एक्स मेडिकल ऑफिसर एवं हाऊस सर्जन
आंतरराष्ट्रीय परिषदेतील संशोधन पेपर परिक्षक
बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
बौध्द साहित्यातील प्रेम संदर्भ आणि मानवी मनातील प्रेम संदर्भ ही भिन्न भिन्न भाव आहेत. बौध्द साहित्यातील प्रेम आयाम हे मानवी मुल्य निगडीत आहेत. *"बुध्द तत्वज्ञानाची खरी निव ही प्रेम, मैत्री, अहिंसा, शांती, करुणा ह्या विचाराशी निगडित आहे. आणि त्याला प्रेम आयामाने एकमेकांशी जोडलेले आहे."* आरोग्य आणि आनंदासाठी स्वतःवर प्रेम करणे हे फार सोपे असते. *"प्रेम ही एक शक्तिशाली, सकारात्मक उर्जा आहे. जी शरीर आणि मन यांच्यातील निरोगी संतुलनासाठी आवश्यक ही आहे."* इतर व्यक्तीचे प्रेम ओळखणे हा तर सहज विषय नाही. *"बुध्द साहित्यातील प्रेम संदर्भ हा प्रामाणिक अंतर्मनाचा साद घालणारा असतो. आणि हा सौंदर्यशास्त्र विषयाचा एक भाग आहे."* बुध्द साहित्यामध्ये *"नैतिकवाद"* ह्या आयामाला अन्योन्य साधारण महत्व असुन *"भोगवाद"* ह्या विषयाला अजिबात थारा नाही. *"कालीदास साहित्य"* हे खरे तर *"अनैतिक वादाकडुन भोगवाद"* विषयाकडे गेलेले दिसुन येतात. आणि *कालीदास* ह्याच्या जन्म-मृत्युचा इतिहास एक मोठे कोडे आहे. अर्थात कालीदास हे *"काल्पनिक पात्र"* आहे, असे ही म्हणता येईल. *"आंबेडकरी साहित्य"* हे खरे तर बुध्द साहित्य विचार प्रेरणेतुनचं निर्मित झालेले आहे. *डॉ बाबासाहेब आंबेडकर* ह्यांना भारतीय व्यवस्थेनी दिलेली वेदना आवाहने ही सर्वांना परिचीत आहेत. परंतु बाबासाहेबांनी व्यवस्थेशी कधी बदला घेतलेला नाही. बुध्द मैत्री भावनेची पहाट फुलविली होती. *चक्रवर्ती सम्राट अशोक* ह्यांनी पुनर्जीवित केलेले *"बुद्ध धम्म शासन"* ह्याला बाबासाहेबांनी पुनश्च रोपन केले आहे. सिध्दार्थ गोतम बुध्द हे *"महाकारुणिक बुद्ध"* झाले. चक्रवर्ती सम्राट अशोक हे तर जंबुद्वीपात *"देवानाम पिय"* महामानव झाले. आणि डॉ बाबासाहेब हे प्रथम *"बोधिसत्व"* झाले. आणि बुद्ध मैत्री ह्या भावनेतुन ते *"मैत्रेय बुद्ध"* झाले.
प्रेम आयाम ह्या गंभीर विषयावर विशेष अशी चर्चा करतांना *"आचार्य रजनीश ते ओशो रजनीश"* असा हा व्यक्ती विषय *कालिदास* ह्या सारखा काल्पनिक विषय नाही. बुध्दांनी आपले वारीश हे संघाला मानले. *ओशो रजनीश* ही अगदी त्याच मार्गाने गेले. आचार्य रजनीश ह्यांचे पुस्तक *"संभोग से समाधी तक"* हे खुप चर्चीत झाले होते. बरीच मान्यवर ही सुध्दा *"रजनीश शिष्य"* झालेली आहेत. काही शिष्य ही माझ्या परिचीतही होती. पुढे एका शिष्याने तर बुध्द - आंबेडकराचा मार्ग सोडुन *"रजनीश मार्ग"* हा पत्करला होता. तो एक चांगला लेखक होता. त्यानी *"रजनीश विचाराशी निगडीत"* बरीच पुस्तके लिहिली आहेत. त्या रजनीश शिष्याच्या पुस्तकाला स्वतःला बुध्द - आंबेडकरी म्हणणा-या एका *"नामांकित प्राध्यापकांनी"* प्रस्तावना ही दिली होती. तो रजनीश शिष्य एकदा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की, *"मी त्याच्या एका पुस्तकाच्या विमोचनात प्रमुख अतिथी व्हावे."* मी मात्र त्या *ओशो रजनीश शिष्याच्या* पुस्तकाला *"प्रमुख अतिथी"* होणे नाकारले. कारण रजनीश हा विषय माझ्या बुध्दीला कधीच पटलेला नव्हता. *"कालीदास आणि रजनीश"* ह्यांच्या लिखाणावर मी भाष्य काय करावे ??? *ओशो रजनीश* ह्याला भारतामध्ये विरोध सुरू झाला. *ओशो रजनीश ह्यांनी पुढे अमेरिकेत आश्रय घेतला.* रजनीश सोबत होती पर्सनल सेक्रेटरी *मां शीला आनंद.* ह्या पुर्वी रजनीश ह्यांची खाजगी सचिव *मां लक्ष्मी* होती. परंतु मां शीला आनंद ही मां लक्ष्मी हिला दुर सारण्यात सफल झाली होती. हा इतिहास शब्द मर्यादेमुळे आटोपता घेतो. *ओशो रजनीश* ह्यांचे सर्व काही व्यवहार सुत्रे *मां शिला आनंद* ही हलवीत होती. मां शिला आनंद हिने अमेरिकेतील *"ओरगान"* शहरालगत जंगलातील *"६२००० एकर जमिन "ओशो फाऊंडेशन"* ह्या पैश्यातुन विकत घेवुन *"रजनीशपुरम्"* हे शहर वसविले. अमेरिका ह्या देशात एक शहर बसविणे इतके सहजही नव्हते. ओशो रजनीश ह्यांच्या *"सेवेमध्ये ९६ रोल्स राईस लक्झरी कार आणि एक जेट विमान"* होते. अर्थात ओशो रजनीश ह्यांचा श्रीमंती थाट कल्पना करु शकता. परंतु काही कारणे झालीत. ओशो रजनीश ह्यांना अमेरिका हा देश सोडावा लागला. *मां शीला आनंद* हिला जेल झाली. *"रजनीश - शीला"* ही विभक्त झालीत. *ओशो रजनीश* ह्यांनी भारतामध्ये पाय ठेवल्यावर ओशो रजनीश म्हणाले होते की, *"मी बुध्दाच्या धरतीवर पाय ठेवीत आहे."* मुलत: ओशो रजनीश हे *"तेरा पंधी जैन"* होते. *शीला आनंद* हिचा इतिहास ही खुप अलग होता. अमेरिकी *मार्क हेरीस सिल्वरमेन* हे शीलाचे पहिले पती होते. मार्क ह्यांचा मृत्यु झाल्यावर रजनिश शिष्य *जॉन शेल्फर* ह्यांच्या सोबत शीला हिनी दुसरा विवाह केला. अमेरिकेत शीला ही जेलमधुन सुटल्यानंतर स्वीस नागरीक *उर्स बिर्नास्टील* ह्यांच्या सोबत शीला हिने तिसरा विवाह केला. *शीला आनंद* ही ओशो रजनीश ह्यांच्यापासुन अलग झाल्यावर ही, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर म्हणाली की, *"ओशो हे आज ही माझे गुरु आहेत. मी ओशोवर खुप प्रेम करते."* परंतु ओशोची विचारधारा *"संभोग से समाधी तक"* ह्यामुळे शीला आनंद ही *"एड्स"* ह्या रोगामुळे मृत्युला प्राप्त झाली. बुध्दाच्या अष्टांग मार्गातील *"समाधी"* (Concentration) ही सम्यक मार्ग दाखविणारी आहे. तर ओशो रजनीश ह्यांची *"समाधी"*??? हा विवाद विषय आहे. *"विपश्यना"* (Meditation) हा अलग विषय आहे. मग *ली होंगजी* ह्यांची *"फालुन दाफा असो वा फालुन गोंग"* साधना असो, ही विपश्यना साधना पासुन अलग असा विषय आहे. सांगावयाचे असे की, *"आपण कोणत्या मार्गाने जात आहो, ती दिशा समजुन घेणे आपल्याला खूप गरजेचे आहे."* भावनेच्या आहारी जावुन कुठलाही निर्णय घेता कामा नये.
*"प्रेम"* (Love) हा व्यापक विषय आहे. सोप्या सरळ भाषेत मानवी दृष्टिकोनातून *"प्रेम म्हणजे दुस-या व्यक्तीबद्दल / प्राणी / वस्तु बद्दल तीव्र आकर्षण - भावनिक आसक्ती / काळजी / जवळीक / संरक्षण / आकर्षण / आपुलकी / विश्वास"* ह्या संदर्भाचा समावेश होतो. प्रेमाची काही विविध रंगी रुपे ही आहेत. जसे की - *रोमॅंटिक प्रेम* (लैंगिक आकर्षण - भावना आधारित) / *मित्र प्रेम* (मैत्री - विश्वास - सहकार्य आधारित) / *कुटुंब प्रेम* (कौंटुबिक आपुलकी - काळजी) / *स्नेह* (व्यक्ती - वस्तु प्रती स्नेह भाव) / *परोपकार* (इतरांना मदत करणे - कल्याणकारी भावना). प्रेमाची काही गुणधर्म ही दिसुन येतात. जसे की - *आत्मियता* (जवळीक - विश्वास) / *उत्कटता* (तिव्र प्रेम भावना) / *बांधिलकी* (नाती जपणे). तसे बघितले तर *प्रेम* हे मानवी जीवनात खुप आवश्यक विषय आहे. सिध्दार्थ हे गोतम बुध्द बनण्यापुर्वी *"राजकुमार सिध्दार्थ - यशोधरा"* ह्यांंचे निस्सिम प्रेम संदर्भ / यशोधरा हिचा त्याग आणि जबाबदारी हा सहज असा विषय नाही. *आम्रपाली* हिचे तर वैशालीची नगरवधु बनने / *"आम्रपाली - सम्राट बिंबीसार"* ह्यांचे निस्सिम प्रेम / देश प्रेमासाठी आपला प्रेमी शत्रू देशाचा सम्राट आहे, म्हणून त्या दोघांचे वियोग होणे, हा प्रेम संदर्भ समजुन घेणे गरजेचे आहे. *महात्मा ज्योतिबा फुले - सावित्रीबाई* ह्यांच्या अंतर्मन प्रेमाचे, आम्ही कधी मुल्यमापनचं केले नाही. हाच प्रश्न *बाबासाहेब डॉ आंबेडकर - रमाई* ह्यांच्या अंतर्मन प्रेमाचा ही आहे. त्यांच्या त्यागाचे केवळ बखाणचं गात आलो आहे. परंतु कृतीशीलता ही आमची शुण्य राहीलेली आहे. *"साहित्य लिपी - भाषा उगम"* हे मुलत: बुध्द विचार आहेत. ह्याबाबत हवे तसे संशोधन - प्रसार - प्रचार हा कधी झालाचं नाही. कुकुरबिटा सारखे लिखाण रचल्या गेले. *बुध्द - आंबेडकरी साहित्याला फक्त "विद्रोह - नकार" ह्या सिमित करण्यात आले.* बुध्द - आंबेडकरी साहित्यातील *"सौंदर्यशास्त्र - नैतिक वाद - मानवतावाद - प्रेम भाव"* इत्यादी अहं शोधण्याचा कां प्रयास केला नाही ? हा माझा प्रश्न आहे. भोमणगिरी साहित्यिकांची लाचारी स्विकारण्यात आली. *आचार्य अश्वघोष* ह्यांचे एका कन्येशी प्रेम होणे - वियोग झाल्यानंतर *"उर्वशी वियोग"* नाटक लिहिणे हा भावनेचा विषय असला तरी, *"बुध्द साहित्याने आपली नैतिकता"* जोपासलेली आहे. इसवी सन १० व्या शतकानंतरचे *वैदिक युग* हे अनैतिकता वादाचे युग होते. *"भोगवाद"* युग होते. *"वैदिक युगातील साहित्याने"* - भोगवाद / अनैतिकता वाद / भ्रष्टाचार / धोकादारी / अविश्वास ह्या सर्व सीमा आत्मसात केलेल्या दिसुन येतात. प्रेम संदर्भ हे बदललेले आहेत. अर्थात अध:पतनांच्या राज्याची ती पहाट दिसुन येते !!!
-----------------------------------------
▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
नागपूर, दिनांक १६ नोव्हेंबर २०२५
No comments:
Post a Comment